ताज्या घडामोडी

विजया दशमी निमित्ताने भगवा गोंडा , पिवळाधम्मक झेंडू ऐशी ते शंभरीपार ..!

विजया दशमी निमित्ताने भगवा गोंडा , पिवळाधम्मक झेंडू ऐशी ते शंभरीपार ..!

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता. ५ प्रतिनिधी.

विजया दशमी निमित्ताने भगवा गोंडा , पिवळाधम्मक झेंडू ऐशी ते शंभरीपार गेला आहे. भांगरवाडी , छञपती शिवाजीमहाराज चौक , जयचंद चौक येथे जागा मिळेल तेथे भगवा गोँडा व पिवळाधम्मक झेंडू फुलांचा भाव शंभरीपार गेला.क्विंटल ला हजाराचा भाव म्हटल्यावर गोँड्याने या कोरोनाच्या नंतर आलेल्या विजयादशमीला शेतकरी , विक्रेते यांना चांगला भावा मिळाला..

लोणावळा बाजारपेठेत झेंडू फुले , आपट्याची पाने -सोने , तसेच मिठाई , पेढे , बर्फी , तसेच हार , आणि नवीन कापड खरेदीसाठी लोणावळा बाजारपेठेत चांगली गर्दी उसळली होती..

आपट्याची पाने विक्री करण्यासाठी खालापूर , खोपोली मधून आदिवासी महिला मुली यांनी चौकात गर्दी केली होती.

दहा रूपये जुडी , प्रमाणे विक्रेत्यांनी आपल्याजवळ आसलेले ओझे खपविण्यासाठी या बरोबरच आंब्याची पाने , भाताच्या लोमट्या , तसेच विविध वस्तूंची खरेदी ग्राहकांकडून करण्यात येत आसल्याचे दिसले….

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!