ताज्या घडामोडी

 श्री डोळसनाथ महाराज मंदीर ट्रस्ट ने आयोजित शारदिय नवरात्र उत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

विजया दशमी निमीत्त ग्राम प्रदक्षिणा व छबिना पालखी -सायं 6.00वा गावातील टाळ-मृदुंगाच्या गजरात निघाली.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी, ६ ऑक्टोबर

श्री डोळसनाथ महाराज मंदीर ट्रस्ट ने आयोजित शारदिय नवरात्र उत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात रोज सायंकाळी 4 .00 वा श्रीसूक्त.स्तोत्र.कुन्जिकास्तोत्र पठण.जप.देवीची गाणी.जोगवे. महिला भजनी मंडळ भजन. व हरिपाठ.
नवचंडी याग.

रोज सायंकाळी दीप प्रज्वलन.
शिक्षण मंडळातील शाळा क्र 4 च्या लहान मुलींचा भोंडला
रात्री 8 ते 8.30 आरती
हळदी -कुंकू असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते.

  • विजया दशमी निमीत्त ग्राम प्रदक्षिणा व छबिना पालखी -सायं 6.00वा गावातील टाळ-मृदुंगाच्या गजरात निघाली. गावातील सर्व भजनी मंडळ .महिला भजनी मंडळ .गुरव.ग्राम पुरोहीत, पालखीचे मानकरी भोई समाज, गोंधळी समाज, गणेश मंडळे.श्री डोळसनाथ तालीम मंडळ. श्री डोळसनाथ ऊत्सव समिती. श्री डोळस नाथ मंदीर ट्रस्ट. समस्त गावकरी सीमोलंघनासाठी मंदिरातून निघाली व परत मंदिरात येऊन आरती ने नवरात्र उत्सवाची सांगता झाली.

दसऱ्या निमित्त  बुधवार दिनांक 5 ऑक्टोंबर 2022 चा छबिना पालखी  डोळसनाथ मंदिरातून-दीपमाळ प्रदक्षिणा-श्रीमंत सरदार दाभाडे सरकारच्या राजवाड्यासमोरुन .चावडीचौक-गणपती चौक-भोई आळीतून-तळ्याच्या पाळी- डाळआळीगणपती चौक फिरून-राजेंद्र चौक मार्गे-शाळा चौक..गणपती चौक-राजवाडा व परत श्रीच्या मंदिरात आल्यावर श्रीची पारंपरिक आरती करण्यात आली.

अशी  माहिती  श्री डोळसनाथ मंदीर ट्रस्टच्या वतीने  देण्यात आली..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!