भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका यांच्या वतीने • अश्विन पौर्णिमा वर्षावास सांगता कार्यक्रम बौर येथे संपन्न.
भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका अध्यक्ष . रवि भवार यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले..
आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, 10 ऑक्टोबर :
भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका यांच्या वतीने • अश्विन पौर्णिमा वर्षावास सांगता कार्यक्रम बौर येथे दि. 9 रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीत रा. ट्रष्टी चेअरमन ॲड. सुभाष जौजाळे व उद्योजक. संजय जौजाळे उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका अध्यक्ष . रवि भवार यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले त्याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका नाणे मावळ आंदर मावळ व पवन मावळचे धम्म अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
ॲड. सुभाष जौजाळे यांच्या हस्ते मावळ तालुका नवनिर्वाचित कार्यकारणीला नियुक्त पत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले हे सर्व नियोजन भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका अध्यक्ष. रवि भवार व सर्व कार्यकारणी पवनारंजन मित्र मंडळ आणि रमाई महिला मंडळ यांनी केले भोजनदान करुन कार्यक्रम संपन्न झाला. त्या प्रसंगी नुकतीच अंदर मावळ उपाध्यक्षपदी पुर्ननिवड होणारे तुकाराम डोळस यांच्या समवेत . रवि भवार,
राहुल जाधव, विलास देसाई, . सुरेश शिंदे, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब सोनवणे, रामचंद्र भालेराव, . राजू जाधव, नितीन ओव्हाळ , अशोक चौरे, संतोष कदम, संदीप जाधव, आयु. किशोर गायकवाड, आयु. किरण भालेराव, सौरभ भवार, प्रमोद गायकवाड व इतर मावळ तालुका बौद्ध महासभा पदाधिकारी उपस्थित होते. तसेच स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचे सर्व सभासद उपस्थित होते.