ताज्या घडामोडी

सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचा अवमानकारक उल्लेख गुगलने अखेर बदलला…

कान्होजी राजांचे योगदान अतुलनीय आहे ! पण दुर्भाग्य बघा, इतक्या शूर वीर नौका नायकाला 'pirate' म्हणून संबोधले गेले आहे ! ही गोष्ट वेळीच सुधारणे गरजेचे आहे. या करिता आपण एक काम करून त्याची तक्रार गुगल पेजवर आमचे वार्ताहर, अजय बंधाले यांनी केले. 

सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचा अवमानकारक उल्लेख गुगलने अखेर बदलला…

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ११ ऑक्टोबर.

हिंदवी स्वराज्याचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचा गुगल सर्च इंजीनवर करण्यात आलेला पारेट्स अर्थात समुद्र चाचे असा अवमानकारक उल्लेखामुळे इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमींमध्ये मोठ्या असंतोषाची लाट उसळली होती.

सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचा हा अवमानकारक उल्लेख बदलावा या मागणीकरीता स्वयंस्पूर्तीने तब्बल 65 हजार 800 नेटकर्‍यांनी सलग तीन दिवस ऑनलाईन आंदोलन करुन गुगल सर्च इंजीनकडे पाठविलेले ईमेल,मेसेज, त्यांच बरोबर फेसबुक, ट्यूटर,इन्स्टाग्राम करुन केलेल्या पाठपूराव्याची दखल घेऊन गुगल सर्च इंजीनने सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचा पारेट्स अर्थात समुद्र चाचे असा केलेला उल्लेख रविवारी रात्री हटवला असल्याने या ऑनलाईन आंदोलनास यश प्राप्त झाले आहे.

हिंदवी स्वराज्याच्या नौदलाचा प्रमुख सरखेल, अठरा किल्ले आणि सालाना दोन कोटी महसूल आलेल्या भू भागाचा कर्तुम अकर्तुम अधिपती. किमान अडीचशे गलबत, गुराब, मचवे, फ्रिगेटचे दल बाळगणारा सेनानायक. ज्याच्या शिक्क्याच्या दस्तका शिवाय इंग्रज – पोर्तुगीज आदी पश्चिमी सत्तांचे एकही जहाज पश्चिम सागर भ्रमण करु शकत नव्हते असा सागराधीपती. ज्याने एकहाती इंग्रज आणि पोर्तूगीज यांचा सागरी उन्माद उधळून लावत मराठा जरी पटक्याचा दरारा सागरावर प्रस्थापित केला, अशा विराचे पायरट हे वर्णन समस्त भारतवासीयांच्या करीता अपमानास्पद आहे. यावर आक्षेप नोंदवणे गरजेचं आहे, अशी भूमिका सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी गेल्या तीन दिवसांपूर्वी मांडली होती.

तब्बल 65 हजार 800 नेटकर्‍यांच्या सातत्यपूर्ण पाठपूराव्याची दखल घेऊन अनमानकारक उल्लेख बाजूला केल्यावर सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे आरमार प्रमुख असलेल्या सरखेल कान्होजी आंग्रे यांचे बाबत गुगल वर सर्च केले असता कान्होजी आंग्रे यांचे वर्णन पायरट असे केलेले दिसत होते. गेल्या तीन दिवसांपासून मी, पूणे येथील मल्हार पांडे आणि असंख्य इतिहास प्रेमी हा विषय समाजमाध्यमावर लोकांपुढे घेउन गेलो. मुद्रित माध्यमे, दृक-श्राव्य माध्यमे, ट्विटर,आदी समाज माध्यमांवर हा विषय गेले तीन दिवस प्रचंड प्रमाणात चर्चिला गेला.

आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्याच देशातील पराक्रमी इतिहासाचा वारसा असलेल्या थोर सेना सरखेलांचे असे विकृत वर्णन समस्त देशासाठी लांछनास्पद होते.

पुढे बाेलताना ते म्‍हणाले, सोशल मीडिया वरून माझ्या या मागणीला समस्त जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि गूगल सर्च वर मास रिपोर्ट केले. जनमताच्या या प्रचंड रेट्यामुळे गूगल सर्च इंजिनवर रविवारी रात्री पासून पायरट हे वर्णन हटविल्याचे दिसून येत आहे.हा पूर्णपणे आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्न आणि सहभागाचा परिपाक असल्याची भावना आहे असे रघुजीराजे आंग्रे म्‍हणाले.

आपल्या इतिहास पुरुष, प्रथा आणि परंपरा यांचे बाबतीत सजग राहण्याची किती गरज आहे हे या वरून दिसून आले. या कामी मदत करून गूगल वर जाऊन रिपोर्ट करणार्‍या सर्वांचे मन:पूर्वक आभार. या कामात अक्षरशः हजारो मंडळींनी योगदान देऊ केले, व्यक्तिशः प्रत्येकाचे आभार व्यक्त करणे शक्य होणार नाही म्हणून सर्वांचे मी ऋण व्यक्त करीत असल्याचे रघुजीराजे आंग्रे यांनी असे ते शेवटी म्‍हणाले.

ट्विटर वर कोणीतरी पोस्ट केलं होतं की सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे नाव गुगल सर्च केल्यावर ‘pirate’ *समुद्री डाकू म्हणून येत आहे, याची शहानिशा करून घ्यावी म्हणून आम्हीसुद्धा सर्च केलं आणि खरंच गुगल वर दुर्दैवाने सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या नावाच्या description झाली pirate लिहिलेले होते.

मुळात, या गोष्टीवर आक्षेप का घ्यावा याचं संक्षिप्त रुपात उत्तर देतो आहोत. ज्या वेळेला पोर्तुगीज, ब्रिटीश, डच आणि इतर काही परकीय हल्लेखोर भारताच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या ठिकाणांवर हल्ला करीत होते, लुटत होते, तेव्हा कान्होजी राजांनी त्यांना चांगला ‘सडकवून’ काढला होता.

कान्होजी राजांच्या भयामुळे अनेक हल्लेखोर त्यांच्या भागात यायचा विचार सुद्धा करत नव्हते ! कान्होजींच्या शौर्याच्या कथा खूप आहेत. कालांतराने, 1951 साली मराठा नौदलाचे ‘admiral’ कान्होजी राजे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘INS ANGRE’ या नावाने एका ‘stone frigate’ ला नाव देण्यात आले.

कान्होजी राजांचे योगदान अतुलनीय आहे ! पण दुर्भाग्य बघा, इतक्या शूर वीर नौका नायकाला ‘pirate’ म्हणून संबोधले गेले आहे ! ही गोष्ट वेळीच सुधारणे गरजेचे आहे. या करिता आपण एक काम करून त्याची तक्रार गुगल पेजवर आमचे वार्ताहर, अजय बंधाले यांनी केले होते. आणि त्यांच्या तक्रारीला यश आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!