ताज्या घडामोडी

लोणावळा शहरात कँन्सरमुक्त अभियान व जनजागृती , मोफत कँन्सर तपासणी शिबीर ता.१७ रोजी ..

लोणावळा शहरात कँन्सरमुक्त अभियान व जनजागृती , मोफत कँन्सर तपासणी शिबीर ता.१७ रोजी ..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.१३(प्रतिनिधी )

लोणावळा शहरात कँन्सरमुक्त अभियान व जनजागृती , मोफत कँन्सर तपासणी शिबीर ता.१७ रोजी भारतीय जनता पार्टी , लोणावळा व भारतीय जनता पार्टी जैन प्रकोश आणि लायन्स क्लब आॕफ लोणावळा सुप्रिमोज यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.

महिला मंडळ सभागृह , हुडको काॕलनी , लोणावळा येथे सकाळी १० ते ५ या वेळेत कँन्सर डिटेक्शन बसच्या माध्यमातून भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने कँन्सरमुक्त महाराष्ट्र अभियान ” हा विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे. आसे आयोजक गिरीश पारख  विश्वनाथ पुट्टोल , संतोष चोरडिया – आणि सुप्रिया देशपांडे  यांचेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबीरात स्ञियांसाठी ब्रेस्ट कँन्सर , गर्भाशय कँन्सर , महिला व पुरूषांसाठी लंग कँन्सर , wbc रक्ततपासण्या निशुल्क केल्या जातील.
तरी या संधीचा ४० वर्षावरील नागरिकांनी लाभ घ्यावा ,असे संयोजक यांनी अवाहन केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!