ताज्या घडामोडी

रेल्वेस्टेशनवर साफ – सफाई करणारी महिला कर्मचारी आरोपींच्या हल्यात गंभीर जखमी ;आरोपीस अटक..!

सचिन एकनाथ पवार (वय-३१,रा-आपटी , भोर ,पुणे ) असे अटक आरोपीचे नाव आहे.

रेल्वेस्टेशनवर साफ – सफाई करणारी महिला कर्मचारी आरोपींच्या हल्यात गंभीर जखमी ;आरोपीस अटक..!

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा, प्रतिनिधी ता.१४ ऑक्टोबर..

लोणावळा रेल्वेस्टेशनवर साफ – सफाई करणारी महिला कर्मचारी आरोपींच्या हल्यात गंभीर जखमी झाली असून लोणावळा शहर पोलिसांकडून ;आरोपीस अटक करण्यात आले आहे. कचरा उघड्यावर नको टाकू म्हटल्याचा राग येवून कोयत्याने केला महिलेवर हल्ला ; नशीब बलवत्तर म्हणून, महिला थोडक्यात बचावली.

सचिन एकनाथ पवार (वय-३१,रा-आपटी , भोर ,पुणे ) असे अटक आरोपीचे नाव आहे. या घटनेत अलका राजू साबळे (वय -३८,रा-करंजगाव , ता-मावळ) यांनी लोणावळा शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपीस तात्काळ आटक करण्यात आली आहे.

बुधवारी ही घटना अलका साबळे या कामावर असताना घडली. लोणावळा तिकीटघराजवळ उड्डाणापूल,  ओव्हर ब्रीजवर साफसफाई करताना आरोपी सचिन पवार याने उघड्या जागेवर कचरा दोनवेळा टाकल्याने आलकाताई यांचेकडून त्यास इतरञ कचरा टाकू नको असे सांगून पार्कींग भागात साफसफाईस आल्या असता ;त्यांचे जवळ आरोपीने धावून जात पिशवीत असलेला लोखंडी कोयता घेवून त्यांचेवर खांदा व डाव्या डोळ्याजवळ हल्ला केला.

त्यात त्यांना गंभीर दुखापतीस सामोरे जावे लागल्याने त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.तसेच आरोपीस पोलिसांकडून अटक करण्यात आले. लोणावळा शहरचे पोलिस निरिक्षक सिताराम डुबल यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिसनिरिक्षक सुनिल पोवार, पुढील तपास करीत आहे…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!