ताज्या घडामोडी

महापालिकेच्या ६८ शिक्षण सेवकांना ‘दिवाळी भेट ’.महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचा नियमितीकरणाचा निर्णय..

भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा..

महापालिकेच्या ६८ शिक्षण सेवकांना ‘दिवाळी भेट ’महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचा नियमितीकरणाचा निर्णय भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा..

आवाज न्यूज :  पिंपरी चिंचवड प्रतिनिधी , १४ ऑक्टोबर..

पिंपरी- चिंचवड महापालिका अंतर्गत काम करणारे ६८ शिक्षण सेवक नियमित सेवेत घेण्यात येणार आहे. त्यामुळे ३ वर्षे सेवाकाळ पूर्ण केलेल्या शिक्षण सेवकांना आयुष्यभरासाठी “दिवाळी गिफ्ट” मिळाले आहे.

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी शिक्षण सेवकांना न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला. पिंपरी- चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत कार्यरत ७८ प्राथमिक शिक्षण सेवकांपैकी ६८ शिक्षण सेवकांचा तीन वर्षे कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण झालेला आहे.

शासन निर्णयानुसार, केवळ ६ हजार रुपये तुटपुंज्या मानधनावर संबंधित शिक्षण सेवकांनी सेवा बजावली आहे. दि. १७ सप्टेंबर २०२२ अखेर बहुतेक सर्वच शिक्षण सेवकांचा सेवा कालावधी पूर्ण झाल्याने आता त्यांना मिळणारे मानधनही बंद होणार आहे. त्यामुळे संबंधित शिक्षण सेवकांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शमनोज मराठे यांनी शिक्षण सेवकांना नियमिततेचे आदेश विनाविलंब मिळावेत यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केला होता.

दरम्यान, दि.२७ सप्टेंबर २०२२ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त व प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील , उप आयुक्त श्री. खोत, प्रशासन अधिकारी श्री.नाईकडे यांची भेट घेऊन शिक्षण सेवकांना नियमित वेतन श्रेणीचे आदेश तातडीने मिळावेत. यासाठी चर्चा केली केली होती. आमदार लांडगे यांनी स्वतः पाठपुरावा करून संबंधित शिक्षण सेवकांची मागणी प्रशासनाकडे लावून धरली, अशी माहिती मनोज मराठे यांनी दिली.
पदवीधर शिक्षक संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने शिक्षण सेवकांना दिवाळी पूर्व नियमिततेचे आदेश देण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे निश्चितच ६८ शिक्षण सेवकांची दिवाळी गोड होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!