ताज्या घडामोडी

चैतन्यदायी कोजागिरी साजरी केली ज्येष्ठांनी!-

प्रत्येकाच्या स्मरणात राहील अशी कोजगिरी ज्येष्ठ मित्र मंडळ तळेगाव दाभाडे या संघटनेने काल डॉक्टर विजया भंडारी दादा दादी पार तळेगाव स्थित सौ बवले सभागृहात साजरी केली!

चैतन्यदायी कोजागिरी साजरी केली ज्येष्ठांनी!-

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, १५ ऑक्टोबर.

प्रत्येकाच्या स्मरणात राहील अशी कोजगिरी ज्येष्ठ मित्र मंडळ तळेगाव दाभाडे या संघटनेने काल डॉक्टर विजया भंडारी दादा दादी पार तळेगाव स्थित  बवले सभागृहात साजरी केली!

दूरदृष्टी असलेले संस्थेचे सभा अध्यक्ष सुधाकरजी रेम्बोटकर यांनी सर्वांचे स्वागत आणि प्रास्ताविक सादर केलं! कार्यवाह  गीता वालावलकर यांनी मागील महिन्याचा वृत्तांत वाचला! त्यांच्याबरोबरच, विठ्ठल कांबळे यांनीही कोजागिरीच महत्व उपस्थिताना सांगितलं! त्यानंतर ज्येष्ठ मित्र मंडळाच्या गायक सभासदांनी हळूहळू आपल्या सुरेल स्वरांनी कार्यक्रमाला रंगत भरायला सुरुवात केली!

आपल्या गीतात-” चंद्र आहे साक्षीला”– ही सादर केल्या जाणाऱ्या गीतांची मध्यवर्ती कल्पना असावी म्हणून सर्व गायक वृंदांनी चांदण्या रात्रीची अनुभूती देणारीच गीत सादर केलीत! उपस्थितांतर्फे शाबासकीची थाप- कौतुकाचे शब्द आणि मायेचा स्पर्श आपल्या मनोगतात उपाध्यक्ष डॉक्टर शाळीग्राम भंडारीं यांनी व्यक्त केला!

याचबरोबरच अमेरिकेतील धनाड्य रॉकफेलर याचा जीवन वृत्तांत सांगून- आयुष्यात चार -“वा वा च”- महत्व त्यांनी समजावून सांगितलं! ते चार वा म्हणजे- वाचवा- वाढवा- वापरा आणि वाटा! मग तो तुम्ही कमावलेला पैसा असेल!- वेळ असेल किंवा तुमच्यात वसत असलेल कौशल्य असेल! रॉकफेलर फाउंडेशनच्या माध्यमातून त्याने कमावलेल्या संपत्तीचा विनियोग सामाजिक आरोग्य रक्षणासाठी सातत्याने त्याने दिला! म्हणून त्याला दीर्घायुष्य प्राप्त झाल! त्याप्रमाणेच आयुष्यात जर आपण जे काही कमवलं असेल ते वाटत गेलात तर आपल्यालाही निरोगी- निरामय दीर्घायुष्य प्राप्त होईल असा संदेश डॉक्टरांनी गायक कलाकारांच कौतुक करताना आपल्या मनोगतात व्यक्त केल! यानंतर सप्टेंबर महिन्यातील ज्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस होता त्यांचा यथोचित सत्कार कार्यकारणीच्या शुभ हस्ते करण्यात आला! समारोप करताना मंडळाचे अध्यक्ष सुधाकरजी यांनी सहभागी सदस्यांचे मनापासून कौतुक केलं! पुढेही असे कार्यक्रम राबवण्यास त्यांच्या सहकार्याची अपेक्षा अध्यक्षांनी केली!

त्याबरोबरच वाटचाल या द्विवार्षिक अंकासाठी प्रत्येकाने आपल्या कविता- लेख अनुभव- आजीचा बटवा वगैरे गोष्टींचा समावेश करून हा अंक संग्रहि ठेवावा अशा निर्मितीस कार्यकारणीस सहकार्य करावे असे आवाहन केले! हा आगळावेगळा समारंभ यशस्वी करण्यास  दिगंबर कुलकर्णी यांनी गायक कलाकारांना सहाय्यभूत ठरतील असे विशेष परिश्रम घेतलेत! तुडुंब भरलेल्या सभागृहातील उपस्थितांचे  विठ्ठल कांबळे यांनी आभार मानलेत! सांघिक प्रार्थना अल्पपोहारा बरोबरच चविष्ट दुग्धपानाने कार्यक्रमाची सांगता झाली!

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!