पै. सचिनभाऊ शेळके यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात २०४ रक्तदात्यांनी केले रक्तदान…
पै. सचिनभाऊ शेळके मित्र मंडळ यांच्या वतीने इंद्रायणी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक उद्योजक संतोष (अण्णा) शेळके यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पै. सचिनभाऊ शेळके यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात २०४ रक्तदात्यांनी केले रक्तदान..
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, १७ ऑक्टोबर..
शहराचे माजी नगराध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे नेते पै. सचिनभाऊ बाळासाहेब शेळके यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या रक्तदान शिबिरात अनेक मान्यवरांसह, नागरिकांनी रक्तदान करत २०४ युनिट रक्त संकलन करण्यात आले.
पै. सचिनभाऊ शेळके मित्र मंडळ यांच्या वतीने इंद्रायणी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक उद्योजक संतोष (अण्णा) शेळके यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रविवार दि. १६ ऑक्टोबर रोजी तळेगाव स्टेशन येथील इंद्रायणी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या शिबिरादरम्यान पै. सचिनभाऊ शेळके यांच्या प्रतिमेचे पूजन करून सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला. या शिबिराला उत्तम प्रतिसाद देत २०४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरादरम्यान तालुक्यातील अनेक मान्यवर, नातेवाईक, मित्रमंडळी व पै. सचिनभाऊ शेळके यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कुस्तीची अनेक मैदाने गाजवणाऱ्या पै. सचिनभाऊ शेळके यांना अभिवादन करण्यासाठी पै. संदीप भोंडवे, पै. पांडुरंग खाणेकर यांसह अनेक नामवंत पैलवान मंडळींनी तसेच राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी रक्तदान शिबिरास उपस्थिती लावली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात पै. सचिनभाऊ शेळके यांचे समाजाभिमुख कार्य आणि आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या. २०४ युनिट विक्रमी रक्त संकलन करत, रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी गरवारे ब्लड बँक, सोमाटणे येथील पावन हॉस्पिटल यांसह तीन हॉस्पिटलच्या रक्तपेढींनी रक्त संकलन केले.
सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. पै. सचिनभाऊ शेळके यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित रक्तदात्यांचे व मान्यवरांचे पै. सचिनभाऊ शेळके मित्र मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.