ताज्या घडामोडी

राज साहेब ठाकरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पोलीस बांधवासोबत तळेगाव दाभाडे येथे, दिपावली साजरी..

आपण ज्यांच्यामुळे आपल्या घरात सुरक्षित आहोत, ते म्हणजे आपले महाराष्ट्र पोलीस बांधव. निरज कुलकर्णी तळेगाव दाभाडे मनसे अध्यक्ष (रस्ते साधन सुविधा व आस्थापना)

 सामाजिक : राज साहेब ठाकरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पोलीस बांधवासोबत तळेगाव दाभाडे येथे, दिपावली साजरी..

आवाज न्यूज : वार्ताहर तळेगाव दाभाडे, २३ ऑक्टोबर.

दिवाळी  सण, आपल्या हिंदू धर्मात वर्षातील सर्वात मोठा सण असल्याने, तो सण आपण २ वर्षानंतर जल्लोषात साजरा करत आहोत, पण आपण ज्यांच्यामुळे आपल्या घरात सुरक्षित आहोत, ते म्हणजे आपले महाराष्ट्र पोलीस बांधव ..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज साहेब ठाकरे कायमच पोलीस सोबत असतात आणि कायम राहतात. राज साहेबाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज सचिन भांडवलकर मनसे पुणे जिल्हा अध्यक्ष (रस्ते साधन सुविधा व आस्थापना) ह्याच्या मार्गदर्शनाखाली  तळेगाव दाभाडे पोलीस व तळेगाव दाभाडे वाहतूक पोलीस ह्यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्याचा योग आला आणि सर्व पोलीस बांधवाना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

ह्या प्रसंगी मनसेचे निरज कुलकर्णी तळेगाव दाभाडे अध्यक्ष (रस्ते साधन सुविधा व आस्थापना), पूजा निरज कुलकर्णी तळेगाव दाभाडे स्टेशन विभाग अध्यक्ष (रस्ते साधन सुविधा व आस्थापना), किरण नलावडे तळेगाव दाभाडे सचिन (रस्ते साधन सुविधा व आस्थापना),पंकज हत्ते तळेगाव दाभाडे सहसचिव (रस्ते साधन सुविधा व आस्थापना),प्रथमेश आगळे ( महाराष्ट्र सैनिक ) इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  पोलीस बांधवानी त्यांचा अमुल्य  वेळ दिल्या  बद्धल त्याचे आभार व्यक्त केले. व मनसे कडुन पोलीस बांधवाना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!