ताज्या घडामोडी

हजारो वर्षांपूर्वी वर्धमान महावीराच्या अंतकरणात शब्द उमटले–” अप दिपो भव!”–तू स्वतः दीप हो!-

हजारो वर्षांपूर्वी वर्धमान महावीराच्या अंतकरणात शब्द उमटले–” अप दिपो भव!”–तू स्वतः दीप हो!-

आवाज न्यूज : विशेष लेख. डॉ. शाळीग्राम भंडारी.. २३ ऑक्टोबर.

 

आपली दिवाळी अशीही साजरी करू शकतो! जगद्गुरु संत तुकाराम म्हणतात– जे का रंजले- गांजले! त्यासी म्हणे जो आपुले! तोची साधू ओळखावा- देव तेथेची जाणावा!! कचराकुंडीतून आपला उदरनिर्वाह शोधणाऱ्या आजीला अशाच एका संवेदनशील व्यक्तीने पाहिले! त्या आजीला कायमस्वरूपी मदत करण्याचा त्याच्या मनात आलेला विचार त्याने प्रत्यक्ष कृतीत च आणला! मित्रांनो त्यानंतर जे काही घडलं ते आपण आता प्रत्यक्ष पाहिलं!

मी संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करू शकत नाही हे शाश्वत सत्य आहे कारण तेवढी माझी क्षमताच नाही- पण पेलाभर पाण्याने मी एकाची तहान मात्र निश्चितच भागवू शकतो! या छोट्याशा आपल्या कृतीतून आपण योगी होतात!

मग,आपल्यासाठी वर्षातून येणारी दिवाळी ही- फक्त चार दिवसाची राहतच नाही- तर आपल्याच आयुष्यातील प्रत्येक दिवस हा आपणास दिवाळी सारखीच वाटू लागते ! कारण आपण आता योगी झालेले आहात !

लायन. डॉक्टर शालिग्राम भंडारी{ तळेगाव दाभाडे पुणे}

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!