ताज्या घडामोडी

तळेगाव चाकण महामार्गावरील वाहतूक समस्या आणि रखडलेल्या रस्ते कामाविरोधात ठिय्या आंदोलन..

मराठा क्रांती चौक महामार्ग कृती समिती व जनसेवा विकास समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन व अपघातात मृत्युमुखी पडलेल्या जीवांसाठी शोकसभेचे आयोजन..

तळेगाव चाकण महामार्गावरील वाहतूक समस्या आणि रखडलेल्या रस्ते कामाविरोधात ठिय्या आंदोलन..

वाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी, १२ नोव्हेंबर.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548-डी घोषित होऊन जवळपास 5 वर्षे उलटली तरीही या महामार्गाचे काम लाल फितीत अडकले आहे. अपघात आणि वाहतूक कोंडीच्या समस्येपासून नागरिकांना दिलासा मिळावा व वाहतूक विभागाच्या अनास्थेमुळे महामार्गावरील अपघातांत दिवसेंदिवस झालेली वाढ या विरोधात दि.13 रोजी सकाळी दहा वाजता तळेगाव-चाकण महामार्गावरील मराठा क्रांती चौक महामार्ग कृती समिती व जनसेवा विकास समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन व अपघातात मृत्युमुखी पडलेल्या जीवांसाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान या मार्गावरील रोजची रहदारी आणि वाहन संख्या पाहता रस्ता खूपच अपुरा आणि अरुंद आहे.रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून गेल्या पाच वर्षांत तब्बल 254 बळी गेले आहेत.दैनंदिन वाहतूक कोंडीमुळे आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी तसेच औद्योगिक क्षेत्रातील दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. अगदी राजकीय नेते देखील या वाहतूक कोंडीतून सुटलेले नाहीत. राजकीय इच्छाशक्ती अभावी अद्याप या राष्ट्रीय महामार्गाच्या या कामास प्रारंभ होऊ शकलेला नाही.

वाढते अपघात आणि कोंडी टाळण्यासाठी सकाळी आठ ते सायंकाळी आठ पर्यंत तळेगाव दाभाडे मार्गे चाकणकडे ये जा करण्यास अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. (Talegaon-chakan)परंतु खुद्द वाहतूक शाखेनेच ही नो एंट्री धाब्यावर बसवून वसूली चालू केल्याने ती प्रवेशबंदी नामधारी उरली आहे अशी खंत कृती समिती कडून व्यक्त होत आहे.मंगळवारी (ता.08) सायंकाळी पाचच्या दरम्यान अवजड ट्रकने दुचाकीला धक्का दिल्याने मावळ तालुका आरोग्य संघटनेच्या अध्यक्ष यांचा मृत्यू झालेला.याचे गांभीर्य तळेगाव,वडगाव मावळ वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिका-यांना दिसत नसून त्यामुळे नागरिकांच्या भावना आता अनावर झाल्या आहेत व गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलने करून न्याय मिळत नसल्याने आता जहाल मताने तीव्र आंदोलन करणार आहोत असे कृती समितीने निवेदनात म्हंटले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!