ताज्या घडामोडी

कलापिनीच्या रंगी बेरंगी बाल जत्रेत रमली छोटी छोटी मुले…..

कलापिनी कुमारभवन आणि बालभवनचा बालदिन.......

कलापिनीच्या रंगी बेरंगी बाल जत्रेत रमली छोटी छोटी मुले…..

कलापिनी कुमारभवन आणि बालभवनचा बालदिन…….

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी १४ नोव्हेंबर.

बाळगोपाळांचे स्वागत करण्यासाठी उभे असलेले दोन विदुषक,मुलांना आकर्षून घेणार्या रंगीबेरंगी बलुन्सनी आणि फुलांनी केलेली सजावट,छान ओळीत मांडलेले विविध खाऊंचे आणि खेळांचे स्टाॅल्स,आनंदाने चमकणार्या नजरेने फिरणारे चिमुकले.छोट्यांपासून जेष्ठांपर्यंत हवेहवेस वाटणारे उस्फूर्त वातावरण !

निमित्त होते,कलापिनी कुमारभवन आणि बालभवन तर्फे बाल दिनाच्या पूर्व संध्येला भरलेल्या बालजत्रेचे !दरवर्षी कलापिनी कुमारभवन आणि बालभवनमध्ये बालदिन वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो.यावर्षी मुलांना वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न केला गेला.बाहेरच्या जगात वावरताना..कसे बोलावे,हिशोब कसा ठेवावा यांचा स्टॉल वरील विक्रीतून अनुभव देण्यात आला.त्याच बरोबर मुलांनी,पालकांनी उत्साहाने बालजत्रेचा आनंद सर्वानी मनसोक्त लुटला.

नटराज पूजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ पत्रकार .विवेक ईनामदार यांच्या हस्ते झाले. कोणतेही क्षेत्र महत्वाचेच असून लहान मुलांना कायम आनंदी ठेवून त्यांचे बालपण जपा हे त्यांनी मनोगतातून पालकांना आवर्जून सांगितलं. उद्घाटन फीत कापली आणि सुरु झाला एकच जल्लोष. मुलांनी अहाहा! मंच्यूरियन,भेळ ,पाणीपुरी,मुठीया,सोलकढी , रंगी बेरंगी केक्स,छान चवीची सरबत,चविष्ट सुरळीच्या वड्या,पॉपकॉर्न, छानछान खाऊंचे स्टॉल , मस्त मस्त बॉबी ,सुंदर फुलांची रोपे,कॉस्मेटिक वस्तूंचे स्टॉल पण लावले होते. सापाच्या तोंडातून बॉल काढणे,रिंग टाकणे,पाण्याच्या बाटलीत नाणे टाकणे,पिठात फुंकर मारुन चाॅकलेट शोधणे असे अनेक छानछान खेळ मुलांचे लक्ष वेधून घेत होते. बालजत्रेचं महत्वाचे आकर्षण म्हणजे दोन्ही विदुषक. सर्वांना खळखळून हासवणाऱ्या या विदुषकांबरोबर मुलांनी फेर धरुन,झुकझुकगाडी करुन खूप मजा केली.

सगळ्यांनी मनसोक्त खाऊंवर ताव मारला.विक्री करणारी आणि खरेदी करणारी मुलं यांच्या चेहऱ्यावर वेगळांच आनंद दिसत होता.यातून मुलांना हिशेब कसा करायचा,डिश कशी व्यवस्थित भरायची,एकमेकांशी संवाद कसा साधायचा हे सहजतेने शिकायला मिळाले. ज्ञानेश्वर शिंदे आणि वेदांग महाजन यांनी विदूषकाच्या वेशभूषेत येऊन मुलांची खूप धमाल केले.एकदरीत बालजत्रा’ फुल टू धम्माल’ अशी झाली.😊कार्यक्रमाचं नियोजन कुमारभवन,बालभवन आणि महिलामंच या सर्वांनी कलापिनी कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुध्दे यांच्या मार्गदर्शनाखाली करुन कार्यक्रम यशस्वी केला.कार्यक्रमाला कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे, उपाध्यक्ष अशोक बकरे,कार्याध्यक्ष अंजली सहस्त्रबुध्दे,बाल भवन प्रमुख मधुवंती रानडे उपस्थित होते. लीना परगी यांनी सुत्रसंचालन केले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!