भांगरवाडी येथे भिवंडी , ठाणे येथील वारकरी दिंडीचे व पायी पालखीचे श्री शिवजन्मोत्सव मिञ मंडळाचेवतीने स्वागत..
श्री शिवजन्मोत्सव मिञ मंडळाचेवतीने पालखीबरोबरच्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
भांगरवाडी येथे भिवंडी , ठाणे येथील वारकरी दिंडीचे व पायी पालखीचे श्री शिवजन्मोत्सव मिञ मंडळाचेवतीने स्वागत..
आवाज न्यूज: लोणावळा ता.१५ नोव्हेंबर (प्रतिनिधी )
भिवंडी , जिल्हा ठाणे येथील श्री भागवत धर्माचार वारकरी सांप्रदायिक सामुदायिकपालखी संस्था तालुका मंडळाचेवतीने पायी भिवंडी ते आळंदी पायी पालखी काढण्यात आली असून येथे भांगरवाडी मधील शाळा क्रमांक ५ संत ज्ञानेश्वर विद्यालय , येथे राञी मुक्कामाला होती. येथे सायंकाळी पाच ते साडेआठ यावेळैत श्री शिवजन्मोत्सव मिञ मंडळाचेवतीने पालखीबरोबरच्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी अविनाश ढमढेरे , बाप्पू साबळे , सुरेश ढमढेरे , महेश लवूळकर , मनोज लवूळकर , सामाजिक कार्यकर्ते नंंदकुमार वाळंज , राजेश येवले, बबनराव फाटक, गणेश धामणस्कर, किरीट जोशी, गणेश वाळंज, अनंता वाळंज, सागर साठे, नंदु बोडके, सागर वाळंज आदींच्या वतीने पालखीचे व वारकरी दिंडीचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी ता.१३ रोजी सायंकाळी पाच ते साडेआठ वारकऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यामधे सर्व वारकरी , आबालवृध्द महिला यांनी लाभ घेतला.
आज सकाळी रेल्वेगेटवरून नांगरगाव मार्गे मार्गस्थ झालेल्या पालखी बरोबर असलेल्या वारकऱ्यांचे स्वागत वत्सला निवास या बंगल्यात सामाजिक कार्यकर्ते बाबुजी तथा नंदकुमार वाळंज यांचे हस्ते व माजी सरपंच सौ. वत्सला नंदकुमार वाळंज तसेच त्यांचे सुपुञ सागर वाळंज यांचेतर्फे पालखीला खांदा लावून व वारकऱ्यांचे पंचाआरतीने ओवाळून स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांची चहा , पाणि व सकाळ ची न्याहारीची व्यवस्था करण्यात आली.यावेळी उद्योजक अविनाश ढमढेरे , बाप्पू साबळे , सुरेश ढमढेरे , महेश लवूळकर , मनोज लवूळकर , नंंदकुमार वाळंज , आदी उपस्थित होते.यावेळी उद्योजक राजेश येवले, सेवानिवृत्त कामगारनेते बबनराव फाटक, गणेश धामणस्कर,श्रीराममंदिराचे पुजारी किरीट जोशी, गणेश वाळंज, अनंता वाळंज, सागर साठे, नंदु बोडके आदींनी यावेळी अन्नदान वाटपात सहकार्य केले. ..