ताज्या घडामोडी
मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून ७ कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न..
सोमाटणे, दारुंब्रे, कासारसाई, ओव्हळे रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा करणे
मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून ७ कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न..
आवाज न्यूज : मावळ, प्रतिनिधी, १५ नोव्हेंबर.
मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून सोमाटणे, दारुंब्रे, कासारसाई, ओव्हळे रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा करणे. रक्कम ७ कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन समारंभ मंगळवार दिनांक १५/११/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता. सोमाटणे फाटा या ठिकाणी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
- यावेळी,सोमाटणे ग्राम पंचायतीच्या सरपंच. स्वाती कांबळे ,राकेश शहाजी मु-हे उपसरपंच, नितीन मु-हे सदस्य, विशाल मु-हे सदस्य. व मावळ तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.