ताज्या घडामोडी

वडगाव मध्ये काल्याचे कीर्तनाने कालभैरव जयंती उत्सवाची झाली सांगता..

वाणीभूषण ह.भ. प. गणेश महाराज वाघमारे, (ओतूर,श्री क्षेत्र ओझर )यांचे काल्याचे कीर्तनाने भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

वडगाव मध्ये काल्याचे कीर्तनाने कालभैरव जयंती उत्सवाची झाली सांगता..

आवाज न्यूज :  वडगाव मावळ प्रतिनिधी १८ नोव्हेंबर :

श्री पोटोबा महाराज देवस्थान कालभैरवनाथ कार्तिकी जन्माष्टमी उत्सवाची सांगता समारंभ, गुरुवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी, वाणीभूषण ह.भ. प. गणेश महाराज वाघमारे, (ओतूर,श्री क्षेत्र ओझर )यांचे काल्याचे कीर्तनाने भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

त्रिपुरारी पौर्णिमा झाल्यानंतर  दुसर्या दिवशी, कार्तिक कृष्ण प्रतिपदेला या उत्सवाची सुरवात होत असताना या वर्षी देवस्थान संस्थानने, श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा (कैवल्याचा पुतळा) या ज्ञानामृत सोहळ्याचे आयोजन करत असताना उत्सव काळात भाविकांनी अभिषेक,महापूजा आरती,कथा, हरिपाठ या श्रवण सुखाचा आनंद घेतला.

कथाकार वाणीभूषण ह भ प गणेश महाराज वाघमारे यांनी कैवल्याचा पुतळा कथेचे व कालभैरव देव जन्म कीर्तनाचे सुंदर निरूपण करून येथील भाविकांना मंत्रमुग्ध केले.
महाप्रसादाची व्यवस्था देवस्थान चे विश्वस्त, ॲड तुकाराम पंढरीनाथ काटे यांचे परिवाराचे वतीने करण्यात आली होती.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन देवस्थान चे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त गणेशाआप्पा ढोरे अनंता कुडे,किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ॲड. अशोकराव ढमाले,    ॲड तुकाराम काटे, अरुण चव्हाण,तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे आदीसह ग्रामस्थ यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!