ताज्या घडामोडी
मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर तसेच मोफत शस्त्रक्रिया..
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व उडान फाउंडेशन (पुणे) यांच्या वतीने नेत्ररोग तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे...
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व उडान फाउंडेशन (पुणे) यांच्या वतीने नेत्ररोग तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, २४ नोव्हेंबर.
शिबिराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री मा संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या शुभहस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन मराठे, जिल्हा परिषद सदस्य व प्राथमिक आरोग्य केंद्राचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत होणार आहे.
तरी तळेगाव शहर व परिसरातील नागरिकांनी या मोफत नेत्ररोग तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष रो दीपक फल्ले व प्रकल्प प्रमुख रो किरण ओसवाल यांनी केले आहे.
स्थळ – प्राथमिक आरोग्य केंद्र,
सरकारी दवाखाना सुभाष चौक,तळेगाव दाभाडे
२७ नोव्हेंबर २०२२
वेळ – सकाळी १० ते दुपारी २ वा.