ताज्या घडामोडी

साठी पार केलेल्या 48 वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांचा वर्गमित्राच्या जन्मदिनी राबवला समाज उपयोगी उपक्रम..

विनयचंद्र दिघे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्योगधाम येथील शाळेला रुपये पाच हजारचा धनादेश व तेलाचा डबा देण्यात आला..

साठी पार केलेल्या 48 वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांचा वर्गमित्राच्या जन्मदिनी राबवला समाज उपयोगी उपक्रम

आवाज न्यूज : वार्ताहर , तळेगाव  दाभाडे ,  २४ नोव्हेंबर.

सन १९७४/७५ या वर्षी इयत्ता अकरावी उत्तीर्ण झालेल्या नूतन विद्या मंदिर (सध्याची अँड.पु.वा. परांजपे विद्या मंदिर), तळेगाव दाभाडे या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला वर्गमीत्र विनयचंद्र दिघे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्योगधाम येथील शाळेला रुपये पाच हजारचा धनादेश व तेलाचा डबा उद्योगधाम संस्थेचे विश्वस्त सुरेश झेंड,व उर्मिला बासरकर यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना मदत व्हावी या उद्देशाने मायमर रुग्णालयामध्ये रुपये दहा हजाराचा धनादेश संस्थेचे संचालक डॉ. कामत याना देऊन आपल्या सामाजिक बांधिलकीची उतराई केली.

 ्मागील वर्षी वयाची साठी पार केलेल्या या ग्रुपमधील विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी ग्रुपमधील कै. मुकुंद करंदीकर यांचे निधन झाले. त्यांचे स्मृतिपित्यर्थ ग्रुपकडून नूतन विद्या मंदिर (सध्याची अँड.पु.वा. परांजपे विद्या मंदिर) मधील इयत्ता दहावी मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक लाख रुपये रक्कम संस्थेच्या सोसायटीमध्ये कायम ठेव केली. व त्यातून येणाऱ्या व्याजामधून कायमस्वरूपी इ. दहावीमध्ये  प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्याला बक्षीस देण्याचं नियोजन केलं आहे.

मागील वर्षानंतर आज तागायत ग्रुपमधील साठी पार केलेल्या ज्या वर्गमित्राचा वाढदिवस असेल त्याच्या घरी जाऊन त्याचा सन्मान करून त्याला प्रोत्साहन दिलं जातं. हा उपक्रम कायम राबवला जात आहे.
विनयचंद्र दिघे यांचे आई-वडील यांनी या अगोदर देहदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच विनयचंद्र दिघे यांनी या आगोदर नेत्रदानचा फॉर्म भरला आहेच त्याचबरोबरआपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मृत्यू पश्चात देहदान करण्याचा संकल्प करून देहदानाचा फार्म भरून आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकले.
या कार्यक्रमास ग्रुपचे विद्यार्थी पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस अविनाश बवरे, तळेगाव दाभाडे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष मनोहर दाभाडे, तळेगाव शहर आर पी आय चे माजी अध्यक्ष तानाजी गडकर, सोमाकांत टकले, गोरख बुटे, मधुसूदन खळदे, रमेश डोळे, नंदकुमार कर्णिक, प्रदीप जव्हेरी, सखाराम जगताप, दीपक वाडेकर, तानाजी सावंत, आदी  उपस्थित होते.
या कार्यक्रमात स्वागत मनोहर दाभाडे यांनी केले. धनादेश प्रदान व शुभेच्छा बबनराव भेगडे, अविनाश बवरे सह सर्व उपस्थित मान्यवरांनी केला. अभार सोमाकांत टकले, मधुसूदन खळदे यांनी सर्वांचे आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!