ताज्या घडामोडी

जिल्हा नियोजन समिती मधून मावळ तालुक्याला 47कोटी 60लक्ष निधी मंजूर..!

भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना सरकारच्या माध्यमातून मावळ तालुक्याला  यापुढील काळात. निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मा.मंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे ..

राजकीय:     मा.मंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती मधून मावळ तालुक्याला 47कोटी 60लक्ष निधी मंजूर..!

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २५ नोव्हेंबर.

पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मावळ तालुक्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस  पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 47कोटी 60लक्ष 39हजार रुपयांच्या निधीची विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी दिली.

माजी मंत्री बाळा भेगडे यांनी पुणे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना यांना एकत्र घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,  पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत निधीची मागणी केली होती, पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 47कोटी 60लक्ष 39हजार रुपये मंजूर झालेले आहेत या पुढील काळात भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना सरकारच्या माध्यमातून मावळ तालुक्याला  यापुढील काळात. निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याला निधीची तरतूद करत असताना मावळ तालुक्यातील विद्यमान आमदारांनी सुचविलेल्या मागील काळातील विकासकामांना देखील कोणतीही स्थगिती न देता 100% निधी देण्याचं काम केलं असून यापुढेही कोणतेही राजकारण न करता तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असू, असे बाळा भेगडे यांनी आवाज न्यूजला सांगितले..

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!