ताज्या घडामोडी

मुलांचे निरागस बालपण मोबाईलच्या दुनियेत हरवून देऊ नका, त्यांना बालपणाचा आनंद घ्यायला शिकवा ती आपली जबाबदारी आहे : गणेश शिंदे सर…

शैक्षणिक वर्गात, उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचां मुथट फिनकॉर्प लिमीटेड तर्फे "विद्या रत्न" प्रशस्तीपत्रक आणि बक्षिस प्रदान करण्यात आले.

मुलांचे निरागस बालपण मोबाईलच्या दुनियेत हरवून देऊ नका, त्यांना बालपणाचा आनंद घ्यायला शिकवा ती आपली जबाबदारी आहे : गणेश शिंदे सर…

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे, वार्ताहर २७ नोव्हेंबर :

मुलांचे निरागस बालपण मोबाईलच्या दुनियेत हरवून देऊ नका, त्यांना बालपणाचा आनंद घ्यायला शिकवा. ती आपली जबाबदारी आहे असे प्रतिपादन मुथूट फिनकॉर्प लिमीटेड तळेगाव ब्रांचचे मॅनेजर गणेश शिंदे यांनी केले. मंगळवार (दि. १४ नोव्हेंबर) रोजी बालदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मुथूट फिनकॉर्प लिमिटेड, तळेगाव शाखा आणि लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा क्रमांक ३ यांच्या संयुक्त विद्यमानाने बाल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक वर्गात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थ्यांना “विद्या रत्न” प्रशस्तीपत्रकाचे वाटप करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला तर आदर्श विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करून बालदिन साजरा करण्यात आला.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान चाचा नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक केशव चिमटे सर यांनी पालक सभेत विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी आदर्श विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

बालदिनानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुथूट फिनकॉर्प लिमीटेड, तळेगाव शाखेचे मॅनेजर गणेश शिंदे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचां मुथट फिनकॉर्प लिमीटेड तर्फे “विद्या रत्न” प्रशस्तीपत्रक आणि बक्षिस प्रदान करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गणेश शिंदे म्हणाले की “आदर्श विद्यार्थी ही काळाची गरज असून मोबाईलच्या या आधुनिक युगात विद्यार्थ्यांनी त्याचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे आणि पालकांनी आपल्या मुलांवर विशेष लक्ष दिले पाहिजे. तसेच त्यांनी शिक्षणामधील आणि जीवनातील शिक्षकांचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाला पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शाळेतील सर्व शिक्षणवृंदांचा मुथूट फिनकॉर्प च्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन आभार मानण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थी वर्गाला खाऊ वाटप करण्यात आला. सदर कार्यक्रमाला मुथुट फिनकॉर्प लिमिटेड तळेगाव शाखेचे कर्मचारी रत्ना महाले, अर्चना कुलकर्णी, स्वप्नाली ढेरंगे मॅडम आणि लोकमान्य टिळक प्राथमिक
शाळेचे मुख्याध्यापक केशव चिमटे सर, छाया गाडे, संतोष बच्चे, अविनाश खुने, संध्या कुलकर्णी, ज्योती बुरांडे, अनुष्का भोसले, सुरेखा घरदाळे, कमल पाटील हे सर्व शिक्षक वृंद, शाळेतील सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!