ताज्या घडामोडी

स्वातंत्र्यसमर महानाट्य पाहण्याचे साक्षीदार व्हा: बाळासाहेब जांभुळकर..

सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यसमर या ऐतिहासिक महानाट्याच्या नियोजित जागेचे पूजन आणि कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

स्वातंत्र्यसमर महानाट्य पाहण्याचे साक्षीदार व्हा: बाळासाहेब जांभुळकर

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, २७ नोव्हेंबर:

तळेगाव दाभाडे शहर ही शूरवीरांची आणि गुणी कलाकारांची भूमी आहे.या शहराला ऐतिहासिक वसा आणि वारसा लाभला आहे.या भूमीत १ते ४डिसेंबर या कालावधीत ॲड. विनय दाभाडे लिखीत आणि दिग्दर्शित
( In the summer of independence, a historical grand drama presenting the 950-year history of India’s armed revolution will be presented. Senior freedom fighters and appeal that we should witness this great drama . )सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यसमर या ऐतिहासिक महानाट्याच्या नियोजित जागेचे पूजन आणि कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या पटांगणात स्वातंत्र्यसमर या ऐतिहासिक महानाट्याचा प्रयोग १ ते ४ डिसेंबर या कालावधीमध्ये होत आहे.यावेळी ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, माजी नगराध्यक्ष ॲड. रवींद्रनाथ दाभाडे,ॲड. विनय दाभाडे,कलापीनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव दाभाडे शहर काँग्रेसचे अध्यक्ष यादवेंद्र खळदे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, माजी उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, देवराईचे अध्यक्ष गिरीष खेर,
तळेगाव दाभाडे शिक्षण मंडळाचे माजी सभापती, उद्योजक अशोक काळोखे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार,माजी नगरसेवक
अरूण भेगडे पाटील, सूर्यकांत काळोखे,अमोल शेटे,
माजी नगरसेविका सुजाता खेर, उद्योजक अरुण भगवान भेगडे, सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुबोध दाभाडे, कार्याध्यक्ष सुनील दाभाडे,
उपाध्यक्ष दीपक दाभाडे, समीर दाभाडे, खजिनदार निलेश दाभाडे, प्रतिष्ठानचे विश्वस्त माजी नगरसेवक संतोष दाभाडे, संपत दाभाडे,सुरेश दाभाडे,छबुराव दाभाडे,अण्णासाहेब दाभाडे, यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते.
अशोक काळोखे म्हणाले,तळेगाव शहारासारख्या ऐतिहासिक शहरामध्ये स्वातंत्र्यसमर या महानाट्याच्या सादरीकरणास यथाशक्ती मदत करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो.यावेळी डॉ. अनंत परांजपे,यादवेंद्र खळदे,
गणेश खांडगे,सुशील सैंदाणे, गिरीश खेर, आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक सुरेश दाभाडे यांनी केले. आभार सोमनाथ दाभाडे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!