आठ महिन्यांपासून टाळाटाळ करत, दस्त नोंदणीस नकार दिल्याच्या कारणावरून दुय्यम निबंधक कार्यालयात केला आत्महत्येचा प्रयत्न.
किरण शांताराम भोसले या व्यक्तीने वडगाव मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयातच विष पिऊन केला आत्महतेचा प्रयत्न...
दस्त नोंदणीस नकार दिल्याच्या कारणावरून दुय्यम निबंधक कार्यालयात केला आत्महत्येचा प्रयत्न.
आवाज न्यूज: वडगाव मावळ प्रतिनिधी, २९ नोव्हेंबर.
– दुय्यम निबंधकांनी दस्ताची नोंदणी करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून सोमवारी (दि.२८) किरण शांताराम भोसले या व्यक्तीने वडगाव मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयातच विष पिऊन आत्महतेचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
पवन मावळातील बेडसे येथील जमीन खरेदीचे दस्त नोंदणी करण्यासाठी किरण भोसले हे वडगाव मावळ येथील दुय्यम कार्यालयात आले होते. भोसले हे खरेदी करत असलेली जमीन ही खाजगी वनिकरण असलेली होती. तसेच या मिळकतीचे त्यांनी चुकीचे मूल्यांकन केले असल्याने दुय्यम निबंधक संतोष जणार्ध नाकारल्याच्या कारणावरून किरण भोसले यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसानी वेळेत घटनास्थळी धाव घेऊन भोसले यांना पुढील उपचारासाठी सोमाटणे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
किरण भोसले हे खरेदी करत असलेल्या जमिनीचे त्यांनी चुकीचे मुल्यांकन केले असल्याने आम्ही दस्त करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून भोसले यांनी स्वत:च पोलिसांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.संतोष कराळे (प्रभारी दुय्यम निबंधक) :
या संदर्भात किरण भोसले यांनी दुय्यम निबंधक यांना लेखी पत्र देत त्यात असे म्हंटले आहे की, भोसले बेडसे येथील विकत घेत असलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्याच्या इतर हक्कात वानिकरणाचा शेरा असल्याने दुय्यम निबंधक हे दस्त करून देण्यास मागील आठ महिन्यांपासून टाळाटाळ करत होते.
मात्र या बाबत शासनाची कोणतीही हरकत नसल्याचे परिपत्रक आम्ही जोडून देखील दस्त नोंदणीस विनाकारण टाळाटाळ करून पैशांची मागणी करत असल्यामुळे आपल्या समोर विष पिऊन आत्महत्या करत आहे असे किरण भोसले यांनी आवाज न्यूजला सांगितले.