दिवंगत माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन..
अशी माहिती पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे यांनी दिली.
दिवंगत माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन..
आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी,१० डिसेंबर.
मावळचे दिवंगत माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय (आठवले गट), शिवसेनेचे दोन्ही गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, मनसे आदी पक्षांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. ११) वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे सकाळी ११ वाजता ही श्रद्धांजली सभा होणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे यांनी दिली.मावळ भाजपा अध्यक्ष रवींद्र अप्पा भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, आरपीआय (आठवले गट)अध्यक्ष नारायण भालेराव, काँग्रेस आय अध्यक्ष यशवंत मोहोळ, बाळासाहेबांची शिवसेना अध्यक्ष राजेश खांडभोर, शिवसेना अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आशिष ठोंबरे, मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष संस्थापक अध्यक्ष रमेश साळवे आदी मान्यवरांनी या शोकसभेचे आयोजन केले आहे.