राष्ट्रवादीचे अध्यक्ष. शरद पवार यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी: सिल्व्हर ओक निवासस्थानी फोन..
ग्रामदेवी पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी: सिल्व्हर ओक निवासस्थानी फोन
आवाज न्यूज : मुंबई प्रतिनिधी, १३ डिसेंबर.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कालच पवारांचा ८३ वा वाढदिवस साजरा करण्यात आला झाला. त्यानंतर लगेचच हा फोन आल्याने खळबळ माजली आहे.
शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी फोन करून ही धमकी देण्यात आली. आरोपीने शरद पवारांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर लगेच अज्ञात व्यक्तीविरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिली. सिल्वर ओकवरील टेलिफोन ऑपरेटर पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी ग्रामदेवी पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.