ताज्या घडामोडी

सर्व पक्षीय निषेध मोर्चा ..

राष्ट्र पुरूषांविषयी मा. चंद्रकांत पाटील पालक मंत्री यांनी, जी अवमानकारक वक्तव्य केले त्याचा निषेध करण्यासाठी, वडगाव मावळ येथे, सर्व पक्षीय निषेध मोर्चा पार पडला..

सर्व पक्षीय निषेध मोर्चा ..

आवाज न्यूज : वडगाव मावळ वार्ताहर, १३ डिसेंबर.

राष्ट्रपुरूषांविषयी मा. चंद्रकांत पाटील पालक मंत्री यांनी जी अवमानकारक वक्तव्य केले त्याचा निषेध करण्यासाठी मंगळवार दि. १३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान येथून तहसिल कार्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात आला होता.

मा. चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री यांनी पैठणच्या सभेत महर्षी भाऊराव पाटील, महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भिक मागून शाळा काढल्या असे बेजबाबदार वक्तव्य करून जो राष्ट्रपुरूषांचा अवमान केला त्याचा निषेध म्हणून मावळ तालुक्यातील सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केले होते.

सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते, अध्यक्ष, मावळ चे आमदार. सुनील अण्णा शेळके, तालुका अध्यक्ष. गणेश खांडगे तसेच, ॲड. रंजनाताई भोसले आणि इतर पदाधिकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून, आपला निषेध व्यक्त केला.

मा. तहसिलदार / पोलिस निरिक्षक यांना निवेदन देण्यात आले.  राष्ट्रपुरुषांविषयी मा. चंद्रकांत दादा पाटील पालक मंत्री यांनी जी अवमानकारक – वक्तव्य केले त्याचा निषेध करण्यासाठी मंगळवार दि. १३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान येथून तहसिल कार्यालय पर्यंत मोर्चाचे आयोजन केले आहे.

राष्ट्रपुरुषांविषयी मा. चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री यांनी पैठणच्या सभेत महर्षी भाऊराव पाटील, महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भिक मागून शाळा काढल्या असे बेजबाबदार वक्तव्य करून जो राष्ट्रपुरूषांचा अवमान केला त्याचा निषेध म्हणून मावळ तालुक्यातील सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केले आहे.

या मोर्चाचे निवेदन देत असताना सर्व पक्षांतर्फे अशी मागणी करण्यात येत आहे की बेजवाबदार पणे वक्तव्य करणा-या पालकमंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील यांचा शासनाने त्वरीत राजीनामा घ्यावा व राष्ट्रपुरुषांचा अवमान करणा-या पालक मंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा हि विनंती.

या मोर्चात मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या सर्व सेल चे अध्यक्ष आणि कार्यकर्ते सामील झाले होते.

तसेच बीआरएसपी अध्यक्ष रमाकांत तरूण मंडळ,  अध्यक्ष, राष्ट्रीय कॉंग्रेस, अध्यक्ष विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,वंचित बहुजन आघाडी,

अध्यक्ष, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे),अध्यक्ष,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,अध्यक्ष,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष,अध्यक्ष,.बीएसपी,शाहू,फुले,आंबेडकर प्रतिष्ठानसर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन  सुहास गरुड यांनी केले होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!