ताज्या घडामोडी

आय एम ए तळेगाव शाखा- आयोजित सातवी वैद्यकीय ” टीमाकॉन 2022″– परिषद यशस्वीपणे नुकतीच पार पडली!

डॉक्टर दिलीप भोगे,  स्मरण व्याख्यानमाला आय एम ए तळेगाव शाखेने नुकतीच सुरू केलेली आहे!

आय एम ए तळेगाव शाखा- आयोजित सातवी वैद्यकीय ” टीमाकॉन 2022″– परिषद यशस्वीपणे नुकतीच पार पडली!

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, २१ डिसेंबर.

या परिषदेचे उद्घघाटक प्रमुख पाहुणे – आय एम ए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष- डॉक्टर रवींद्र कुटे, हे होते! दीपप्रज्वलां नंतर परिषदेचे अध्यक्ष. डॉक्टर अमित कुलकर्णी, यांनी शब्दफुलांनी मान्यवरांचे स्वागत केले! त्यानंतर आय एम ए शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करण्यात आलं ! आय एम ए च्या सभासदांची कर्तव्वे आणि अधिकारा च्या संदर्भात प्रमुख पाहुणे, डॉक्टर रवींद्र कुटे,  यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि परिषदेला शुभेच्छा दिल्या!

डॉक्टर दिलीप भोगे,  स्मरण व्याख्यानमाला आय एम ए तळेगाव शाखेने नुकतीच सुरू केलेली आहे! या व्याख्यानांतर्गत आपलं मनोगत व्यक्त करताना विशेष अतिथी डॉक्टर मंगेश पाटे, सरांनी आरोग्य संपन्न समाजासाठी स्वतः डॉक्टर आरोग्य संपन्न कसा राहील याचा अत्यंत अभ्यासपूर्ण परमर्ष घेतला व सर्व उपस्थित डॉक्टरांची मने जिंकलीत! पिंपरी चिंचवडचे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ.डॉक्टर दिलीप कामत, यांनीही परिषदेला शुभेच्छा देऊन आपलं मनोगत व्यक्त केलं! ज्येष्ठ सदस्य डॉ.शालिग्राम भंडारी, यांनी डॉ.दिलीप भोगेसरांच्या आठवणी अतिशय संवेदनशील शब्दात व्यक्त केल्यात! या वैद्यकीय परिषदेचे कार्यक्षम सेक्रेटरी- डॉ. दत्तात्रय गोपाळघरे यांनी प्रास्ताविकानंतर जीवन गौरव सन्मानर्थी” डॉक्टर प्रशांत कामत “यांचा अतिशय उत्कृष्ट शब्दात सभेला परिचय करून दिला! त्यानंतर डॉक्टर प्रशांत कामत, यांचा जीवनगौरव सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला! सन्मान स्वीकारल्यानंतर डॉक्टर प्रशांत कामत सरांनी अत्यंत भावपूर्ण शब्दात सर्वांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करून आपल्या विनम्र स्वभावाचा वस्तू पाठच सभागृहाला दिला! विशेष अतिथी- मायमर मेडिकल कॉलेजचे प्रतिनिधी म्हणून– प्रसिद्ध डॉ.सचिन नाईक यांनीही या वैद्यकीय परिषदेला मनापासून शुभेच्छा दिल्या!

सकाळच्या सत्रात विविध वैद्यकीय विभागातील शोधनिबंध अनेक पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी या परिषदेत सादर केलेत! दुपारच्या सत्रात ज्ञान आणि अनुभव संपन्न अशा डॉक्टरांनी विविध वैद्यकीय विभागातील अत्याधुनिक रोग निदान आणि त्यावरील उपचाराची अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती उपस्थित डॉक्टरांना देऊन त्यांच्या ज्ञानात वाखणनीय भर घातली! ही वैद्यकीय परिषद मायमर मेडिकल कॉलेजच्या आत्याधुनिक सुश्रुत सभागृहात यशस्वीपणे पार पडली! आय एम ए तळेगाव शाखेचे सेक्रेटरी- डॉ. सचिन विटनोर यांनी- ही परिषद यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्व सन्माननीय पाहुणे आणि ज्या ज्या संस्थांचा आर्थिक सहभाग होता अशा-सर्वांचे मनःपूर्वक आभार मानलेत!

त्यानंतर  या वैद्यकीय परिषदेची सांगता झाली!  डॉक्टरांसमोर येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची सेवा ही ईश्वरसेवाच असावी त्यासाठी अत्याधुनिक साधनं आणि त्याचं ज्ञान प्रत्येक डॉक्टरांना असावं हाच या वैद्यकीय परिषदेमागील संयोजकांचा उद्देश होता! आणि तो 100% यशस्वी झाला याची अनुभूती सहभागी झालेल्या डॉक्टरांच्या नजरेतच सर्वांना दिसत होती! हीच ही वैद्यकीय परिषद यशस्वी झाल्याची खरी पावती होती!

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!