ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ तळेगाव च्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

तळेगाव दाभाडे येथील मस्करनीस कॉलनी 2 मधील टकले कॉलनी समोरील मोकळ्या मैदानावर असलेल्या दोन झोपड्यांमध्ये एक ठाकर समाजातील आजी आजोबांना ब्लँकेट व जेवणाच्या सामानाचे वाटप..

लायन्स क्लब ऑफ तळेगाव च्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, ३१ डिसेंबर.

तळेगाव दाभाडे येथील मस्करनीस कॉलनी 2 मधील टकले कॉलनी समोरील मोकळ्या मैदानावर असलेल्या दोन झोपड्यांमध्ये एक ठाकर समाजातील आजी आजोबा राहत आहेत,त्यांच्या घरातील मुले सध्या तिथे दिसत नाहीत त्यामुळे सदर आजी आजोबांचे हाल सुरू असल्याचे  काल सोशल मीडिया वर संदिप भेगडे यांनी प्रसिध्द केले होते.

आजी जवळपास लाकडे जमा करून चूल पेटवून आपल्याला जमेल तशी गुजरान करत आहे,सदर आजीचा एक हात तुटलेला असून डाव्या हाताने भाकरी बनवून स्वतःसह शेजारच्या झोपडीतील वृद्धास मदत करत आहे,
आजी एका स्वतंत्र झोपडीत राहत असल्या तरी शेजारी असलेल्या दुसऱ्या झोपडीला कुलूप असून सदर बाबा बाहेरील छोट्या आडोशाला राहत आहेत,सध्या थंडीचे दिवस आहेत,सदर बाबांचा चालताना तोल जात आहे,बरेच दिवस आंघोळ नसल्याने कपड्यांना दुर्गंधी सुटली आहे,या दोन्ही वृद्धांना समाजाकडून धान्य,ब्लॅंकेट आणि कपडे या आधाराची गरज आहे, असे कळताच लायन्स क्लब ऑफ तळेगाव च्या वतीने लायन मेंबर्स त्या ठिकाणी पोचले. होते तिथे पाहिले असता ,प्रीती वैद्य मॅडम  देखील आलेल्या होत्या, आपण नेलेल्या ब्लँकेट व जेवणाचे सामान त्या आजी-आजोबांना देण्यात आले.

लायन केतन ओसवाल यांनी आजी आजोबांच्या जेवणाची व्यवस्था केली होती व लायन ट्रेझरर सचिन शहा यांनी आजी आजोबांना दोन गोधड्या दिल्या आहेत येथे यांच्याबरोबर लायन अध्यक्ष मयूर राजगुरव सेक्रेटरी लायन राजेंद्र झोरे व लायन सुनील वाळुंज उपस्थित होते.

त्यांचे भोजन झाल्यानंतर प्रीती वैद्य मॅडम  संचालित लायन डॉक्टर दीपक भाई शहा यांच्या आर्थिक सहकार्यातून, लायन्स क्लब तळेगाव ने बांधलेल्या किनारा वृद्धाश्रम मध्ये स्वतः प्रीती वैद्य मॅडम व त्यांचे एक सहकारी ह्या आजी आजोबांना घेऊन गेलेले आहेत या कार्यासाठी प्रीती वैद्य मॅडमचे कौतुक करू तितके कमीच आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!