ताज्या घडामोडी

कीर्तनकार सद्गुरू श्री बाबामहाराज सातारकर यांचे मंञ मंदिरात गाथा पारायण , अखंड हारिनाम सप्ताहाची  सांगता..

नवनर्षानिमित्त कीर्तनसेवेने दरवर्षी ह.भ.प.सातारकर वर्षाचा पहिला दिवस साजरा करतात.

कीर्तनकार सद्गुरू श्री बाबामहाराज सातारकर यांचे मंञ मंदिरात गाथा पारायण , अखंड हरिनाम सप्ताहाची  सांगता..

आवाज न्यूज : लोणावळा  प्रतिनिधी, २ जानेवारी, २०२३.

कीर्तनकार सद्गुरू श्री बाबामहाराज सातारकर यांचे मंञ मंदिरात गाथा पारायण , अखंड हरिनाम सप्ताहाची ता.१ रविवारी ह.भ.प.बाबामहाराज सातारकर यांचे काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.या वेळी गाथामधील सर्व अभंगाला भिंतीवर लावण्यासाठी ते स्वच्छ फायबर व प्लास्टरवर लिहण्यात आली आहे.

सकाळी नऊ वाजण्याचे सुमारास काल्याचे कीर्तन सुरू झाले  नवनर्षानिमित्त कीर्तनसेवेने दरवर्षी ह.भ.प.सातारकर वर्षाचा पहिला दिवस साजरा करतात.या नववर्षांचे सेलिब्रेशन करण्यासाठी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील तसेच मुंबई , पुणे व उपनगरातील बाबामहाराज यांचे निष्ठावंत वारकरी उपस्थित राहतात..तसेच सर्वजण येथे सात दिवस राहतात..कुटूंबातील सदस्यांना घेवून आलेल्या शंभर दिडशे वारकरी यांची निवास व्यवस्था याच आवारात केली जाते..पंचक्रोशितील लोणावळा परिसरातील वारकरी व श्रोते या सप्ताहाला हजेरी लावतात….

श्री क्षेत्र दुधिवरे येथील राम कृष्ण हरी मंञ मंदिरात . शेकडो भाविकांकडून नववर्षांचे पहिल्याच दिवशी अखंड हरिनाम सप्ताह व काल्याचे कीर्तनाचा कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती..ह.भ.प.बाबामहाराज सातारकर यांचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.

यावेळी ह.भ.प.भगवती महाराज सातारकर व चिन्मय महाराज सातारकर हे साथसंगत साठी उपस्थित होते..लोणावळा येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज , आंबवणेचे माजी सरपंच गणपत मेंगडे , सातपुते , तसेच पंचक्रोशितील भाविक आणि सातारकर फडावरील वारकरी , टाळकरी , मृदूंगमणी , विणेकरी , चोपदार आणि माई महाराज सातारकर आदी उपस्थित होते..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!