नाशिक जिल्ह्यातील महत्वाचं तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराबाबत (Trimbakeshwar Temple) महत्वाचा निर्णय..
मंदिर सात दिवसांसाठी बंद राहणार असल्याची माहीती मंदिर प्रशासनाने दिली आहे
नाशिक जिल्ह्यातील महत्वाचं तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराबाबत (Trimbakeshwar Temple) महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून हे मंदिर सात दिवसांसाठी बंद राहणार असल्याची माहीती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
आवाज न्यूज : नाशिक प्रतिनिधी, ३ जानेवारी,२०२३.
नाशिक जिल्ह्यातील महत्वाचं तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराबाबत (Trimbakeshwar Temple) महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून हे मंदिर आठ दिवसांसाठी बंद राहणार असल्याची माहीती मंदिर प्रशासनाने दिली आहे. बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले श्री त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple) आठ दिवस बंद राहणारआहे.
अति प्राचीन श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे (Trimbakeshwar Temple) संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मात्र वरील काळात त्रिकाल पूजा, पुष्प पूजा या नित्य नैमित्तिक पूजा सुरू राहणार आहेत. मात्र कोणत्याही भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.