ताज्या घडामोडी

एमआयटी ज्युनिअर कॉलेज तळेगाव येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शिक्षक सहविचार सभा संपन्न.

एमआयटी ज्युनिअर कॉलेज तळेगाव येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शिक्षक सहविचार सभा संपन्न.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, ४ जानेवारी, २०२३.

येत्या ९ आणि १० जानेवारी २०२३, रोजी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग पंचायत समिती मावळ, शिक्षण विभाग, तालुका विज्ञान अध्यापक संघ, मुख्याध्यापक व उच्च माध्यमिक संघ आणि एमआयटी ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात करण्यात आले आहे.

याबाबतची शिक्षक सहविचार सभा दिनांक 30 डिसेंबर रोजी एमआयटी ज्युनिअर कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी तालुक्यातील 50 पेक्षा जास्त शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माननीय गटशिक्षणाधिकारी  वाळुंज सर उपस्थित होते.

त्याचबरोबर एमआयटी कॉलेजचे प्राचार्य. विनोद साळवे सर, मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष.  विठ्ठल माळशिखारे सर, मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष. सुरेश सुतार सर, जिल्हा विज्ञान समन्वयक  वसंत बुरांडे सर यावेळी उपस्थित होते.

प्रदर्शनाची नियमावली आणि प्रदर्शनाबाबतच्या अनेक गोष्टींवर यावेळी चर्चा करण्यात आली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!