ताज्या घडामोडी

लोहगड व घेरेवाडी परिसरात कलम १४४ लागू.

मावळचे उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मावळ - मुळशी संदेश शिर्के यांनी लागू केला आहे.

लोहगड व घेरेवाडी परिसरात कलम १४४ लागू.

आवाज न्यूज : पवना नगर प्रतिनिधी, ५ जानेवारी,२०२३.

लोहगड किल्ल्यावर हाजी हजरत उमरशावली बाबा दर्ग्याचा उरुस दि. ६ व ७ जानेवारी रोजी होणार आहे. या उरुससाठी मोठया प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने तसेच हा उरुस होऊ नये याकरिता बजरंग दल व इतर संघटनांनी प्रखर विरोध दर्शविला आहे.

त्याला स्थानिक ग्रामपंचायती यांनी पाठिंबा दर्शविला असल्याने दोन समाजात तेड निर्माण होण्याची शक्यता आहे. लोहगडावरील दर्गा व मजारी यांचा कोणताही ऐतिहासीक पुरावा नसल्याने मा. न्यायालयाचे आदेशानुसार प्रतापगडावरील अनाधिकृत बांधकाम जमिनदोस्त केले आहे त्या प्रमाणे लोहगडावरील अनाधिकृत बांधकाम काढावे, ही बांधकामे अधिकृत करण्यासाठी उरूसाचा वापर केला जातआहे.

त्यामुळे लोहगडावर उरूस होवू दिला जाणार नाही असे या संघटनांनी सांगितले आहे. तसेच यावर्षी कोणत्याही परिस्थितीत हा अनाधिकृत उरूस होवू देणार नाही याप्रसंगी मोठे जनआंदोलन, मोर्चा उभारू असेही सांगितले आहे.

भारतीय पुरातन विभाग पुणे यांनी देखील लोहगडावर दर्ग्याचे उरूसास परवानगी नाकारली असून, त्या दरम्यान पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. यामुळे लोहगडावरील दर्ग्याच्या उरूसाच्या दरम्यान हिंदू मुस्लिम समाजाचे लोक मोठया प्रमाणात लोहगडाचे परिसरामध्ये येण्याची शक्यता असल्याने कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून दि ५.१.२०२३  ते ८.१.२०२३  दरम्यान लोहगड व घेरेवाडी या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश मावळचे उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मावळ – मुळशी संदेश शिर्के यांनी लागू केला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!