ताज्या घडामोडी

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा..

दोन वर्षाच्या कोरोना कालावधीनंतर हे स्नेहसंमेलन अतिशय आनंदात व सुव्यवस्थितरित्या पार पडले.

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी ९ जानेवारी.

शनिवार दि.7 जानेवारी 2023. तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 6 जानेवारी व 7 जानेवारी या दोन दिवसात अतिशय उत्साहात संपन्न झाले. दोन वर्षाच्या कोरोना कालावधीनंतर हे स्नेहसंमेलन अतिशय आनंदात व सुव्यवस्थितरित्या पार पडले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे विश्वस्त  विलास काळोखे व इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष. रामदास काकडे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगर नियोजन अधिकारी. राहुल गीते, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे विश्वस्त. युवराज काकडे. निरुपा कानिटकर, मावळ तालुका इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष.चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांना बोलावण्यात आले होते.

तसेच संस्थेचे संस्थापक. चंद्रकांत काकडे,  संस्थेचे सचिव  प्रशांत शहा तसेच शाळेच्या सचिव . राजश्री म्हस्के, संस्थेचे खजिनदार .अनिल तानकर व शाळेच्या खजिनदार . गौरी काकडे , संस्थेचे इतर मान्यवर , शाळेच्या मुख्याध्यापिका. मीना अय्यर , सर्व शिक्षक वृंद, पालक रुंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित होते.

बालवाडी गट, तसेच इयत्ता पहिली ते दहावी या इयत्तेतील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन विविध कार्यक्रमातून, नृत्यातून व नाट्या विष्करातून सर्वांना पाहायला मिळाले. या सर्व नृत्य नाट्य व इतर कलाविष्कारांसाठी कोरिओग्राफर प्रसाद मंचरे व शाळेच्या शिक्षिका यांनी काम पाहिले दोन दिवसांच्या या कार्यक्रमात शाळेचे सर्व वातावरण अतिशय उत्साहवर्धक जाणवत होते.

कोरोना कालावधीनंतर घेण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी सर्वच विद्यार्थी – पालक व शिक्षकांनी उत्साह दाखविला. या कार्यक्रमात शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. वर्षभरातील त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे साफल्य झाल्याचे दिसले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!