ताज्या घडामोडी

स्मायलींग हार्ट सोशल ग्रुपच्या वतीने मागील आठ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम संपन्न ..

 आश्रम शाळेतील मदतीचा हा एक छोटासा खारीचा वाटा.. स्मायलींग हार्ट सोशल ग्रुप.. 

स्मायलींग हार्ट सोशल ग्रुपच्या वतीने मागील आठ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम संपन्न ..

आवाज न्यूज : रेशमा फडतरे, मावळ प्रतिनिधी, १३ जानेवारी.

गरीब मुलांना आर्थिक मदत, आश्रमातल्या मुलांना वस्तुरूपी मदत ,शाळेतल्या गरीब मुलांना शिक्षणासाठी दत्तक, ब्लड डोनेशन, वृक्षारोपण, मावळातील, आदिवासी वाड्यावस्त्या तील अतिशय बिकट अवस्थेतील मुलांना शालेय साहित्याची मदत ,खाऊ वाटप असे अनेक उपक्रम ग्रुपने या सात ते आठ वर्षांमध्ये केले..

कशाळ येथील एका उपक्रमात एका गरीब मुलीला मदत केल्यानंतर तिची बातमी पेपरला आल्यानंतर असंख्य लोकांकडून तिला मदतीचा हात मिळाला…
हॉस्पिटल मधील एका मुलाच्या ऑपरेशन साठी मदत उभी करणे तसेच सफाई मोहीम असेल तर ग्रुप मधील प्रत्येक मेंबर मदतीला उभा असतोच…

ग्रुपच्या या कामामुळे समाजातील अनेक स्तरातील लोकांनी सुद्धा लोकांच्या मदतीला हातभार लावला स्माईलींग हार्ट सोशल ग्रुप हा खरंतर मदतीचा हात देणारा समाज,( दानशूर ते गरजवंत) आणि ज्यांना गरज आहे असा समाज यामधील एक दुव्याच काम करतो.

ग्रुपमधील बरेच जण काहीजण जॉब करतात काही बिझनेस करतात काही शिकतात काही हाऊस वाईफ आहेत पण समाजाशी आपलं काही देणं लागतं, या भावनेने दर दीड दोन महिन्यांमध्ये काही ना काही उपक्रम करत आहेत ,जेणेकरून गरजवंताला त्याची किमान गरज भागेल त्यासाठीच  आश्रम शाळेतील मदतीचा हा एक छोटासा खारीचा वाटा.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!