ताज्या घडामोडी

रंगांच्या दुनियेत रमली मुले….

कलापिनीच्या कै.मे.ना.वा.खानखोजे २०२३ चित्रकला स्पर्धा प्रचंड प्रतिसादात संपन्न....

रंगांच्या दुनियेत रमली मुले….
कलापिनीच्या कै.मे.ना.वा.खानखोजे २०२३ चित्रकला स्पर्धा प्रचंड प्रतिसादात संपन्न….

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १७ जानेवारी..

कलापिनीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे कै.मे.ना.वा.खानखोजे चित्रकला स्पर्धा उत्साही प्रतिसादात संपन्न झाल्या.झाल्या. स्पर्धेचे हे ३९ वे वर्ष होते.
मावळ,पिंपरी चिंचवड, खेड येथील शालेय..प्राथमिक,माध्यमिकआणि खुल्या गटासाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व गटांसाठी प्राथमिक फेरी घेण्यात आली प्राथमिक फेरीत सर्व गटात मिळून ७५० मुलांनी स्पर्धेत भाग घेतला होता. माध्यमिक गटातील अंतिम फेरीसाठी ९५ स्पर्धक निवडण्यात आले होते .त्यांच्यासाठी उत्तम मार्गदर्षकांकडून कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अंतिम फेरीत ऐनवेळी दिलेल्या विषयावर स्पर्धा घेण्यात आली.

विराज सवाई आणि तृप्ती पाठक यांनी घेतलेल्या कार्यशाळेत स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन व मुलांचे शंका निरसन उत्तम केले तसेच स्पर्धेचे परीक्षण ही केले. मा.किरण खानखोजे यांनीही स्पर्धकांना मार्गदर्शन केले.प्रसिद्ध डेअरी उद्योजक रो.मनोज ढमाले यांनी नेहमीप्रमाणे स्पर्धेसाठी सहकार्य केले.
पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब कामशेत चे अध्यक्ष ला. ॲड. योगेश गायकवाड आणि त्यांच्या पत्नी लायन  दीक्षा गायकवाड हे उपस्थित होते.

मा..योगेश गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सर्व विद्यार्थी..स्पर्धक,पालक,शिक्षक यांचे कलापिनी स्पर्धेतील सहभागाबद्दल अभिनंदन केले. उत्तम नियोजनबध्द स्पर्धेच्या आयोजनाबद्दल कलापिनीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. भविष्यकाळात कलापिनी बरोबर उपक्रमात सहभागी होण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाला कलापिनीचे अध्यक्ष.विनायक अभ्यंकर ,कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुध्दे तसेच उपाध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख . अशोक बकरे उपस्थित होते. सूत्र संचालन धनश्री वैद्य आणि विराज सवाई यांनी केले.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री.चेतन शहा, श्रीपाद बुरसे, अनघा बरसे, रामचंद्र रानडे, दिपाली जोशी, सुप्रिया खानोलकर, पल्लवी पांढरे, रश्मी पांढरे, पांडुरंग देशमुख, हेरंब बेडेकर, आरती पोलावार, प्रतीक मेहता, संदीप मनवरे, शार्दुल गद्रे, मीरा कोन्नुर, वृषाली आपटे, मनीषा शिंदे, माधवी एरंडे, ज्योती ढमाले ,विशाखा देशमुख यांनी परिश्रम घेतले.

चित्रकला स्पर्धा निकाल.

बालवाडी गट
प्रथम…. अद्वैता कुलकर्णी,बालविकास विद्यालय
द्वितीय….निषका शाह,किडझी स्कूल
तृतीय….ऋतिका बनगर, पैसा फंड शाळा
उत्तेजनार्थ…
अन्वय फुटाणे ..सरस्वती विद्यमंदिर.गार्गी सुलक्षणे, डी. वाय.पाटील
स्वरा देशमुख… माऊंट सेंट. वेदांती पडवळ..के.बी. एस.
समर्थ गडसिंग..आदर्श विद्या मंदिर.
शिशु गट..१ली / २ री
प्रथम…अंजली पाटील, सरस्वती विद्या मंदिर
द्वितीय..विभागून..काव्या कोकाटे,सरस्वती विद्या मंदिर. अद्वैत मोरे..सह्याद्री इंग्लिश स्कूल
तृतीय…प्रणिती चौधरी,बालविकास विद्या मंदिर
लहान गट…३री..४ थी
प्रथम…साची मनवर, सह्याद्री इंग्लिश स्कूल
द्वितीय…विभागून-अबोली मुऱ्हे, जैन इंग्लिश स्कूल, नम्रता मोकाशी.आदर्श विद्या मंदिर
तृतीय..दिशा जगदाळे, कृष्णराव भेगडे शाळा
विशेष पारितोषिके
आर्या दरेकर व जान्हवी पवार..जय वकील स्कूल
शर्मिला बिस्त..SEC स्कूल.
खुला गट.- सौ.योगिता पन्हाळे
५ वी ते ७ वी गट
श्रीलक्ष्मी वर्धी – प्रथम
शुभम मोहंती – द्वितीय
अद्विका भवर – तृतीय
८ वी ते १० वी गट
प्रज्ञा कांबळे – प्रथम
रोनित गुप्ता – द्वितीय
कृष्णा जबदे – तृतीय
विशेष पारितोषिके -साहिल खान , सुखदेव जाधव.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!