ताज्या घडामोडी

पुण्यातील कसबा व चिंचवड विधानसभा पोट निवडणूक जाहीर.

महाराष्ट्रातील भाजपचे दोन विद्यमान आमदार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागेच्या पोटनिवडणूकीसाठी निवडणूका जाहीर..

 राजकीय :  पुण्यातील कसबा व चिंचवड विधानसभा पोट निवडणूक जाहीर.

आवाज न्यूज : मुंबई  प्रतिनिधी, १८ जानेवारी.

महाराष्ट्रातील भाजपचे दोन विद्यमान आमदार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागेच्या पोटनिवडणूकीसाठी निवडणूका जाहीर झाल्या आहेत. कसबापेठ मतदारसंघातील मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी तर पिंपरी चिंचवड येथे लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर होणार पोटनिवडणूक होणार आहे.

या निवडणूकीसाठीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून ७ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. ८ फेब्रुवारी अर्जांची छाननी तर १० फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि या निवडणूकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर होईल.

राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपचे दोन आमदार यांचे मागील महिन्यात निधन झाले होते. यात आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ तसेच चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या.

या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक होईल असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. दरम्यान भाजप विरोधात दोन्ही जागांवर महाविकास आघाडी उमेदवार देण्याची शक्यता आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!