ताज्या घडामोडी

केशवनगरला जोडणाऱ्या भुयारी रेल्वे मार्ग नागरिक व वाहनांसाठी लवकर सुरु करावा..

वडगाव भाजपा चे मध्य रेल्वे पुणे या ठिकाणी  दिले निवेदन

केशवनगरला जोडणाऱ्या भुयारी रेल्वे मार्ग नागरिक व वाहनांसाठी लवकर सुरु करावा..

वडगाव भाजपा चे मध्य रेल्वे पुणे या ठिकाणी  दिले निवेदन..

आवाज न्यूज :  वडगाव मावळ, वार्ताहर, २० जानेवारी.

वडगाव शहरामधील केशवनगर, सांगवी या ठिकाणी जोडणाऱ्या भुयारी रेल्वे मार्गाचे काम गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहें, सदर पुणे लोणावळा रेल्वे मार्गांवर रेल्वेची वाहतूक मोठया प्रमाणावर असल्याने, या ठिकाणी असणारे रेल्वे गेट हे वारंवार जास्त कालावधीसाठी बंदच असते, या कारणाने येथील ये जा करणारे जेष्ठ नागरिक, विध्यार्थी, कामगार वर्ग ,बाजार घेणेसाठी येणारा महिलावर्ग या सर्वांना आपले अपूर्ण असलेल्या कामामुळे नाहक त्रास व वेळेचा खोळंबा होत असताना दिसत आहें.

तसेच एखादा रुग्ण आजारी असल्यावर त्याला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला देखील गेट उघडण्याची वाट पाहत बसावी लागत आहें, त्यामुळे त्याच्या जीवीत्वास धोका निर्माण होण्याची शक्यता आहें.
तसेच गेट बंद असल्यावर दोन्ही बाजूला मोठ मोठया वाहणांच्या रांगा लागत आहेत.

तरी या निवेदणाद्वारे आपण वरील सर्व बाबींचा विचार करून सदर अपूर्ण राहिलेल्या रेल्वे भूयारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करून वडगांव मधील केशवनगर व सांगवीला राहणाऱ्या नागरिकांची दळणवाळणाची होणारी गैरसोय त्वरित दूर करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन वडगाव भाजपचे वतीने मध्य रेल्वे चे डी आर एम इंदुजी दुबे यांना देण्यात आले आहें.

याप्रसंगी शहरअध्यक्ष अनंता कुडे, मा सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगाव भाजपा चे संघटन मंत्री किरण भिलारे, मा सरपंच संभाजी म्हाळसकर, नगरसेवक किरण म्हाळसकर,ऍड विजयराव जाधव, रविंद्र म्हाळसकर, सांगवी चे मा उपसरपंच काशिनाथ तोडकर, शरद मोरे, हरिष दानवेअडीजन उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!