ताज्या घडामोडी

एखाद्या व्यक्तीकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो म्हणजे नेमकं काय ? 

त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत बरेचदा नकारात्मक किंवा चुकीची असू शकते..लायन. डॉ.शाळीग्राम भंडारी..

एखाद्या व्यक्तीकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो म्हणजे नेमकं काय ?  असतं तर त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत बरेचदा नकारात्मक किंवा चुकीची असू शकते.. 

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, विशेष लेख. २१ जानेवारी.

कारण अंतर्मनाच्या भीतीचा परिणाम हा विचारांच्या वर होत असल्याने प्रत्येक व्यक्तीकडे उपजतच असलेली बुद्धिमत्ता आणि क्षमता असून सुद्धा केवळ आणि केवळ आत्मविश्वास गमावल्यामुळे काही व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. मग मित्रांनो चला उदाहरणच घेऊया एखादी व्यक्ती विचार करते की मी हे करू शकेन का माझ्याकडून हे होईल का ?  मी या गोष्टीसाठी लायक आहे का ?  ही भीती आणि मी आणि मीच निश्चित करू शकेन हा असलेला आत्मविश्वास यावर सर्व पुढील परिणाम अवलंबून असतात.

मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या आजूबाजूला काही असेही लोक असतात की ज्यांच्याकडे या आत्मविश्वासाचा प्रचंड साठा असतो त्यांच्यासाठी आत्मविश्वास कधी असतो कधी नसतो हा मुद्दा कधीच येत नाही कारण आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टीची ते कधीच दखल घेत नाहीत त्यामुळे त्यांच्या विचारावर ती काहीही फरक पडत नाही कारण त्यांचा स्वतःच्या कृतीवर विचारांवर क्षमतांवर निर्णयावर पूर्ण विश्वास असतो. आणि त्यामुळेच आत्मविश्‍वास हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य असा भाग ठरतो त्यामुळे होतं काय ; की मला दिलेले काम मी आणि मी स्वीकारलेल आव्हान हे निश्चितपणे पूर्ण करण्याची क्षमता माझ्याकडे आहे, आणि हीच त्यांच्या मनाची सकारात्मक भावना त्यांना ते काम यशस्वी करण्यास उपयोगी ठरू शकते. कारण त्यांच्यातल्या क्षमतेची त्यांना निश्चितच जाणीव असते म्हणून हा आत्मविश्वास मिळण्यासाठी तुमचं काम नीट मुळापासून समजून घ्यायला व पुन्हा पुन्हा चेक करून बघायला हव, व अरे हो मी करू शकतो आणि हीच सूचना मेंदूला वारंवार द्यायला द्यावी पण त्याबरोबरच स्वतःच् अल्पकालीन आणि दीर्घकालीन ध्येय ठरवायला हव, व ह्याबद्दल सुस्पष्टता मनात ही असावीच लागते आणि हेच आपल्या यशस्वी जीवना साठी आवश्यक आहे.

खरोखरच एखाद्या प्रकल्पाचा पूर्ण अभ्यास जर आपण केला असेल तर आपोआपच आत्मविश्वासाची फळ आपल्याला चाखायला मिळतात हाच आपल्या चिंतनाचा मुख्य विषय आहे.

लायन. डॉ.शाळीग्राम भंडारी..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!