ताज्या घडामोडी

मावळ तालुक्यात आढळतात ३६ सापांची जात पाहा संशोधकांचा पूर्ण शोध.

जाणून घ्या कोणते विषारी आणि कोणते बिनविषारी यांचा संशोधन..

मावळ तालुक्यात आढळतात ३६ सापांची जात पाहा संशोधकांचा पूर्ण संशोधन.

आवाज न्यूज: मावळ प्रतिनिधी, २४ जानेवारी.

मावळ तालुक्यात आढळणाऱ्या ३६ सापांच्या जाती जाणून घ्या कोणते विषारी आणि कोणते बिनविषारी यांचे संशोधन मावळ तालुक्यात राहणाऱ्या, जिगर सोलंकी आणि रौनक खरे यांनी आत्माराम आंधळे यांच्या निरीक्षणाखाली पूर्ण केला.३६ जातींमधल्या फक्त ८ साप विषारी आणि त्यातून पण फक्त ४ साप प्रामुख्याने लोक वस्ती मध्ये आढळून येतात. नाग, घोणस, मण्यार, फुरसे हे ४ साप विषारी आहेत आणि बाकीचे  दुर्मिळ आहेत आणि ते जंगल भागात जास्ती करून आढळून येतात. प्रामुख्याने ४ विषारी सापां मधला कोणताही साप चावल्यास घाबरून न जाता वेळ न घालवता जवळच्या रूग्णालयात त्वरित जावे आणि योग्य उपचार करावे.

राहिलेले २६ सापांमधुन सगळ्यात जास्त निघणारे बिनविषारी साप आहेत धामण, दिवड, ननाटी, कवड्या, तस्कर, गवत्या आणि वाळा हे साप लोक वस्ती मध्ये सर्वात जास्त आढळून येतात. काही झाडांवर राहणारे साप जसे हरणटोळ, मंजर्या ,रुका हे पण काही ठिकाणी लोक वस्तीत  आढळून येतात. या सापांपासून लोकांना काहीच जीवाला धोका नाहीये. साप खाद्य व लपायच्या जागा शोधत लोक वस्ती मध्ये येतात .साप जास्त करून उंदीर, बेडूक ,पाल , सरडे, काही इतर साप असे त्यांचे खाद्य आहे.

काही साप असेपण या संशोधनात  मिळाले, की ते फक्त जंगल भागात आढळून आलेत, लोक वस्ती मध्ये नाही. जिगर आणि रौनक ने मावळ तालुक्यातील जवळपास सगळ्या भागात सर्व्हे केला आहे. त्यांनी या सर्व्हे मध्ये जेने करून लोकांमध्ये जनजागृती व्हावी. आणि कोणतीही व्यक्ती सर्पदंशाने  मृत्यु होता कामा नये यासाठी प्रयत्न केले आहेत.आपल्या भागात सर्व साप विषारी नाहीत हे लक्षात ठेवून आपण सावध राहून आपले काम केले पाहिजे. बाहेर फिरताना पायात बुट, रात्री जाताना टॉर्च, जमिनी वर झोपताना मच्छरदाणी चा वापर करावा. घराच्या बाजूला कचरा करुनये , घरात किंवा घराच्या बाहेर जे काही होल असतील ते सगळे पॅक करावे, अडचण तयार करू नये याची काळजी घ्यावी.निसर्गाच्या हानी मुळे खूप साप लोक वस्ती कडे येऊ लागले आहेत आणि काही साप दुर्मिळ किंवा नष्ट होत चालले आहेत.

या संशोधना साठी वनविभाग मावळ, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी संशोधकांनी मदत केली.याचे पूर्ण संशोधन cibtech journal of zoology volume 11 या जर्नल मध्ये हे पूर्ण काम पब्लिश झाले आहे ऑनलाईन आपण जाऊन पाहू शकतो.
अशी माहीती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांनी दिली

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!