ताज्या घडामोडी

४७५० महिला भगिनींचा श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आयोजित हळदी- कुंकू समारंभास उत्स्फूर्त सहभाग..!

सामाजिक ऐक्यासाठी हळदी-कुंकू हे एक भगिनींसाठी स्नेह मिळण्याचे प्रतीक..

४७५० महिला भगिनींचा श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आयोजित हळदी- कुंकू समारंभास उत्स्फूर्त सहभाग..!

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, २५ जानेवारी.

मावळ तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचा हळदी- कुंकू समारंभ उत्साहात पार पडला.कार्यक्रमास तळेगाव मधील ४७५० महिला भगिनीं उपस्थित होत्या.

माता,महिला भगिनी यांचे या निमित्ताने संघटन व्हावे, एकोपा वाढावा व संस्कृतीचे संवर्धन व्हावे, हा उदात्त हेतू मानून,या निमित्ताने कौटुंबिक संस्कृतीचे दर्शन दिले, कुंकू हे सौभाग्य प्रतीक मानल्यामुळे शुभकार्यात त्याचा वापर सुरू आहे आणि स्त्रियांचे कुंकू हे लेणे आहे. सामाजिक ऐक्यासाठी हळदी-कुंकू हे एक भगिनींसाठी स्नेह मिळण्याचे प्रतीक आहे . आपआपसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी यावेळी तिळगुळाचेही वाटप करण्यात आले.

असे पतसंस्थेचे आधारस्तंभ पुणे महानगर नियोजन समितीचे विद्यमान सदस्य तळेगाव दाभाडे नगरपरिषद चे विद्यमान नगरसेवक संतोष छबुराव भेगडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. याप्रसंगी शहर व परिसरातील माता भगिनी मोठ्या संस्थेने उपस्थित होत्या, संस्थेच्या वतीने नूतन भेगडे, श्वेता भोंगाडे, मनीषा पारगे, मेघा भेगडे, संध्या देसाई, आरती राऊत, प्रियंका भेगडे,रंजना आंबेकर शीतल पवार प्रतीक्षा भेगडे स्वाती वि भेगडे तस्लिम सिकिलकर,उषा भेगडे, मनीषा कणसे,सुलभा काळोखे तसेच सर्व तळेगावमधील पतसंस्थांच्या महिला पदाधिकारी, शहरातील आजी-माजी नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सर्व माता भगिनींचे उपस्थितीबद्दल आभार संस्थेचे अध्यक्ष राहुल पंढरीनाथ पारगे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!