ताज्या घडामोडी

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत ई अभ्यासिकेचे लोकार्पण, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा उपक्रम.

तळेगाव दाभाडे: गुरुवार दिनांक २६ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73वा वर्धापन दिन साजरा करत असताना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने एका अनोख्या उपक्रमाचा श्री गणेशा केला.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत ई अभ्यासिकेचे लोकार्पण, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा उपक्रम.

तळेगाव दाभाडे: गुरुवार दिनांक २६ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73वा वर्धापन दिन साजरा करत असताना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने एका अनोख्या उपक्रमाचा श्री गणेशा केला.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर २७ जानेवारी.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री विजयकुमार सरनाईक यांचे शुभहस्ते मोफत ई – अभ्यासिका चे लोकार्पण करणेत आले.
याप्रसंगी बोलत असताना मुख्याधिकारी म्हणाले कि, आजची वाढती बेरोजगारी आणि खाजगी नोकरीची कमी शाश्वतता पाहता शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षा मधून आपले करियर घडवणे कडे विद्यार्थी एक सुवर्णसंधी म्हणून पाहत आहेत. स्पर्धा परीक्षा च्या तयारीचे स्वरूप आता बदलले असून नुसत्या पुस्तकामधूनच अभ्यास करते आता शक्य नाही त्याबरोबर संगणकीय पद्धतीचा अवलंब करण्यासाठी नगरपरिषद मार्फत ई अभ्यासिका तयार करणेचे नियोजन करणेत आले.

अभ्यासिकेसाठीचे आरक्षण असलेल्या संस्कृती अपार्टमेंट, डाळ आळी येथील पहिल्या मजल्यावर मागील ७ ते ८ महिन्यापासून अभ्यासिका सुरु करणेत आली आहे. त्याला विद्यार्थ्यांचा मिळालेला प्रतिसाद पाहता येथीलंच दुसऱ्या मजल्यावर आपण ही ई अभ्यासिका सुरु करत आहोत. याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट सुविधा असलेले 5 कॉम्पुटर व स्पर्धा परीक्षासाठी गुणवत्तापूर्ण असलेले काही खाजगी क्लास जसे Unacademy, Kindle , India Bix , MPSC अड्डा , इत्यादी यांचे मोफत सब्स्क्रिपशन उपलब्ध करून देत आहोत. ह्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त महाराष्ट्र मधील नव्हे तर भारतातीलं विषय तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन ऑनलाईन माध्यमातून आपल्या अभ्यासिकेमध्ये बसून करता येतील.

तसेच यामध्ये टेस्ट सिरीज, शंका निरसन, सर्व पुस्तके डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, याचाही विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. विशेष म्हणजे नगरपरिषद ही सर्वं सुविधा मोफत पुरवणार आहे, त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थी याचा लाभ घेवू शकतील. आपल्या या अभ्यासिकेची आज रोजी एकूण ५० आसनक्षमता आहे.तसेच मुलांच्या ज्ञानामध्ये भर घालणारी सर्व चांगल्या लेखकांची पुस्तके, मासिके व इंग्लिश मराठी वर्तमानपत्रे हे देखील उपलब्ध करून देणेत आलेली आहेत.
या सर्व अभ्यासिकेवर नियंत्रण वं नियमानुसार करनेकारिता नगरपरिषद मार्फत अभ्यासिका समन्व्यक यांचीही नेमणूक करणेत आलेली आहे. अभ्यासिका समन्व्यक हे पूर्ण वेळ अभ्यासिकेमध्ये उपलब्ध राहणार आहेत.

आज ई अभ्यासिका लोकार्पण प्रसंगी नगरपरिषद उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, नगरअभियंता मल्लिकार्जुन बनसोडे, मिळकत व्यवस्थापक जयंत मदने,कर निरीक्षक विजय शहाणे,पाणीपुरवठा अभियंता स्मिता गाडे,लेखापरीक्षक कैलास कसाब, भांडारपाल सतीश राउत,उद्यान पर्यवेक्षक सिद्धेश्वर महाजन, समाजकल्याण विभाग प्रमुख सुवर्णा काळे,आरोग्य विभाग प्रमुख प्रमोद फुले, वरिष्ठ लिपिक रवींद्र काळोखे,PMAY विभाग चैत्राली साळुंखे,तसेच अभ्यासिकेचे समन्व्यक अविनाश गायकवाड व इतर विद्यार्थी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!