स्मार्ट बिगिनींग प्री स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन अतिशय आनंदात साजरा.
कामशेत मधील इंद्रायणी कॉलनीत असलेली अतिशय प्रसिद्ध अशी स्मार्ट बिगिनींग प्री-स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
स्मार्ट बिगिनींग प्री स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन अतिशय आनंदात साजरा.
आवाज न्यूज : कामशेत, प्रतिनिधी २९ जानेवारी.
कामशेत मधील इंद्रायणी कॉलनीत असलेली अतिशय प्रसिद्ध अशी प्री-स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
स्मार्ट बिगिनींग प्री -स्कूलच्या हॉल मध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला होता.या मध्ये सकाळी रोजच्या प्रमाणे मुलांनी प्रार्थना घेण्यात आली ;आणि कार्यक्रम सुरू करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माननिय मान्यवर पालकांच्या हस्ते करण्यात आले.तसेच दीपप्रज्वलनाने कार्यक्रम सुरू करण्यात आला.
यावेळी उपस्थित असलेल्या पालकांनी आपले मत व्यक्त केले, तसेच विध्यार्थी नी ही भाषण केली.
मुलांनी क्रांतीकारक पुरुष व महिला यांची वेशभूषा करुन आलेले ,यावेळी या वेशभूषेतून एकात्मतेचा संदेश ही दिला,हा कार्यक्रम अतिशय देखण्या पद्धतीने मुलांनी साजरा केला हा कार्यक्रम घेण्यात शाळेच्या शिक्षिका रुक्सर शेख यांनी अतिशय मेहनत घेतली.
यावेळी बोलताना पालकांनी शाळेची होत असलेली प्रगतीचा बद्द्ल समाधान व्यक्त केले. शाळेत वेळोवेळी होत असलेले उपक्रम आणि शालेय अभ्यासक्रमातील नवीन प्रयोग यामुळे मुले अतिशय चांगल्या प्रकारे प्रगती करत आहे असे मत अनेक पालकांनी व्यक्त केले.
शाळेचे सर्वेसर्वा प्रफुल्ल ओव्हाळ यांनी ही पालकांना अशीच मदत करण्याची आणि वेळोवेळी लक्ष देण्याची मागणी केली. त्याच प्रमाणे यापेक्षा अधिक चांगल्या सुविधा देण्यात येतील याची ग्वाही ही दिली.
शाळेच्या व्यवस्थापीका व शिक्षिका मा.रुक्सर शेख यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.