ताज्या घडामोडी

आ. कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दीपक जयवंत जाधव तर सचिव पदी श्याम माधव निकम यांची बिनविरोध निवड..

सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आ. कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दीपक जयवंत जाधव तर सचिव पदी श्याम माधव निकम यांची बिनविरोध निवड..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर, ३ जानेवारी.

आ. कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दीपक जयवंत जाधव तर सचिव पदी श्याम माधव निकम यांची बिनविरोध निवड जाहीर झाली.महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१३ च्या नियम ३२ ला अनुसरून आ. कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेची सन २०२२-२३ ते सन २०२७-२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी बिनविरोध निवडणूक १९ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झाली. सदर निवडणुकीनंतर पतसंस्थेच्या कार्यालयात (दि.३) रोजी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापू जयवंतराव भेगडे व निवडणूक निर्णय अधिकारी आर के निखारे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या पहिल्या सभेत पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दीपक जयवंत जाधव, उपाध्यक्षपदी राजेंद्र बबुशा घोजगे, सचिव पदी श्याम माधव निकम, खजिनदार पदी गोपाळ दगडू परदेशी यांची बिनविरोध निवड झाली.तर राजश्री राजेश म्हस्के, भावना बाळासाहेब चव्हाण, बापू जयवंतराव भेगडे, आयुब इस्माईल सिकीलकर, सचिन नंदकुमार भेगडे, तानाजी गणपत दाभाडे, उल्हास रामचंद्र हुलावळे यांची संचालक मंडळ सदस्य पदी   बिनविरोध निवड झाली.

आ. कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था मर्या. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे ची सर्वसाधारण मतदार महिला राखीव अनुसूचित जाती जमाती राखीव इतर मागासवर्गीय राखीव भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातील पदांसाठीची निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आर के निखारे यांनी दि. १९ जानेवारी रोजी जाहीर केले होते. त्यानंतर शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या बिनविरोध पदाधिकारी निवडीनंतर ग्राहकाभिमुख कार्य करून तळागाळातील गरजूंपर्यंत पतसंस्थेच्या योजना पोहोचवणे ठेवी वाढवणे व कर्ज वसुली करून एकूणच संस्थेच्या आर्थिक उलाढालीवर भर देण्याचा संकल्प नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह संचालक मंडळाने केला.

पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापू जयवंतराव भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली बिनविरोध निवडणूक व पदाधिकारी निवडीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी आर के निखारे यांचा आ. कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!