ताज्या घडामोडी

“शिवशाही छावणी संग्रहालयाचा” उदघाटन सोहळा यशस्वीरित्या संपन्न…

ऐतिहासिक वास्तू व शस्रांचे जतन आणी संवर्धन यासाठी निर्माण झालेले "शिवशाही छावणी वस्तू संग्रहालय" याचा दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी उदघाटन समारंभ सोहळा पार पडला.

“शिवशाही छावणी संग्रहालयाचा” उदघाटन सोहळा यशस्वीरित्या संपन्न…

आवाज न्यूज मावळ प्रतिनिधी, ३ जानेवारी.

ऐतिहासिक वास्तू व शस्रांचे जतन आणी संवर्धन यासाठी निर्माण झालेले “शिवशाही छावणी वस्तू संग्रहालय” याचा दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी उदघाटन समारंभ सोहळा पार पडला. या प्रसंगी लोहगडवाडी, घेरेवाडी, पाटण, भाजे व परिसरातील तसेंच मावळ तालुक्यातील मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.

लोहगडवाडीचे  गणेश धनिवले, अलका धानिवले, सरपंच निलेश मरगळे, पाटील, गणेश साबळे, बाळासाहेब ढाकोळ, शंकर ढाकोळ,  सतीष साठे व स्थानिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.प्रस्तुत समारंभात छावणी परिवाराचे प्रमुख. उदय जगताप यांनी संग्रहालय स्थापन करण्यामागची भूमिका विषद केली. ते म्हणाले, “इतिहासाचा अर्थ भविष्यातील वेध घेण्यासाठी लावला जावा.बहुसंख्येने मंडळी या दुर्ग परीघात भ्रमंतीला येत असतात. त्यांना आपला इतिहास् या सह्याद्रीचे खरं सोन म्हणजेच ऐतिहासिक शस्रास्त्र पाहून समजावा हा हेतू आज साध्य होतो आहे.

डॉ. प्रिया बोराडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
डॉ. प्रमोद बोराडे म्हणाले, “मावळ तालुक्याला प्राचीन, शिवकालीन मोठा गौरवशाली वारसा आहे. त्याचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी आमच्या पिढीची आहे. शिवशाही संग्रहालय फक्त ऐतिहासिक वस्तूंचे जतन करण्याचा हेतू ठेवीत नसून स्थानिक तरुणांना दुर्ग इतिहासाचे प्रशिक्षण देण्याचा व वाटाडे तसेंच मार्गदर्शक घडविण्याचा हेतू व उद्दिष्ट यात समाविष्ट आहे. नव्या पिढीचे इतिहासकार या संग्रहालयरुपी ज्ञानातून घडावे हा स्थापनेमागील उद्दिष्ट आहे.

उदघाटन प्रसंगी शंकरराव शेळके म्हणाले, “हा मावळ तालुक्याचा खरा वारसा आहे. याचे जतन आज झाले हे मोठे कार्य साधले आहे”रामदास काकडे म्हणाले, “हा ऐतिहासिक वारसा सह्याद्रीत दुर्मिळ होत चालला आहे. याचे संग्रहालय सुरु होते ही मोठी कल्पक आणी सकारात्मक बाब आहे. मावळ तालुक्यात ही एक मोठी क्रांती सर्वांनी पहावयास येऊन त्याचा लाभ घ्यावा.”सुरेश साखोळकर म्हणाले, “पत्रकारितेत प्रदीर्घ आयुष्य मी पाहिले, या दुर्मिळ वस्तू आणी शस्रास्र संग्रह करणे ही अवघड आणी मोठी जटील प्रक्रिया आहे. स्थानिक परिघातील मंडळीना ही एक मोठी पर्वणी असून याचा फायदा स्थानिक तरुणांना रोजगार निर्माणासाठी होईल. संग्रहालय दुर्मिळ वस्तूंचे असल्याने पर्यटक बहुसंख्येने येथे निश्चित येतील. विजय महामुळकर म्हणाले, “शिवशाही परिवार आणी छावनी परिवार एकत्र शिवचरित्राचा प्रचार आणी प्रसार करेल.

सदर समारंभास जेष्ठ नेते  बाळासाहेब काकडे, जेष्ठ स्वातंत्रसेनानी बाळासाहेब जांभुळकर,  तुषार शेट्ये, इतिहास संशोधक. शैलेश वरखडे,  हरिश्चंद्र गडसिंग, संजय साने,   नंदकुमार शेलार, रणजित खांडगे, समीर खांडगे, संदेश भेगडे, विक्रम काकडे, ह.भ.प. गोपीचंद कचरे, ॲड.विनय दाभाडे, ॲड.गणेश जगताप हे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.आभार प्रदर्शन प्रा.सत्यजित खांडगे यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!