ताज्या घडामोडी

गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महासत्संग सोहळा शनिवार दि. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं. ४:३० वाजता होणार आहे…

नागरिकांनी या पवित्र कार्यक्रमास उपस्थित राहून महासत्संग सोहळ्याचे साक्षीदार व्हावे अशी विनंती, श्री स्वामी समर्थ सेवा सत्संग आयोजन समिती, पुणे. यांच्या तर्फे करण्यात आली आहे.

गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महासत्संग सोहळा शनिवार दि. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं. ४:३० वाजता होणार आहे.

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, ७ जानेवारी.

परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे पीठाधीश, श्री स्वामी समर्थ अष्टशक्तीपीठ, गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर प्रमुख श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) प्रमुख अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे प्रमुख आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे शिल्पकार गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महासत्संग सोहळा शनिवार दि. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं. ४:३० वाजता होणार आहे.

सेवेकरी यांच्या ग्राम अभियाना अंतर्गत भारतीय संस्कृती संवर्धन व बालसंस्कार, राष्ट्रीय विकास, विश्वकल्याण उन्नती, शेती व शेतीचे वास्तुशास्त्र, आयुर्वेद, आध्यात्म, वास्तुशास्त्र, स्वयंरोजगार, पर्जन्य देवता उपासनेसह मानवी जीवनाला परिपूर्ण करण्याकरिता सेवामार्गातील १८ विभागांचे मार्गदर्शन व परमपूज्य गुरुमाऊलींचे कृपाआशिर्वाद या महासत्संग सोहळ्यात प्राप्त होणार आहेत. तरी नागरिकांनी या पवित्र कार्यक्रमास उपस्थित राहून महासत्संग सोहळ्याचे साक्षीदार व्हावे अशी विनंती, श्री स्वामी समर्थ सेवा सत्संग आयोजन समिती, पुणे. यांच्या तर्फे करण्यात आली आहे.

स्थळ : PIECC ग्राऊंड, मोशी, पिंपरी-चिंचवड, पुणे 412105.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!