ताज्या घडामोडी

माता रमाई आंबेडकर यांची जयंती शिल्पकार नगरात त्यागमुर्ती पुरस्कार देवून साजरी..

मावळ तालुक्यात विविध क्षेत्रात काम करणा-या व उपक्रम राबविणा-या महिलांचा त्यागमुर्ती पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.

माता रमाई आंबेडकर यांची जयती शिल्पकार नगरात त्यागमुर्ती पुरस्कार देवून साजरी..

आवाज न्यूज लोणावळा, प्रतिनिधी१० जानेवारी.

माता रमाई भिमराव आंबेडकर यांची १२५ वी जयती शिल्पकार नगरात त्यागमुर्ती पुरस्कार देवून साजरी करण्यात आली.

यावेळी मावळ तालुक्यात विविध क्षेत्रात काम करणा-या व उपक्रम राबविणा-या महिलांचा त्यागमुर्ती पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.यामधे.आनिता सूर्यकांत वाघमारे , रोहिणी सुदाम सरवते , मंदा आनंद भालेराव , शोभना चंद्रकांत गायकवाड , कांताबाई भालेराव , सुरेखा भालेराव , बेबी ओव्हाळ , रेऊबाई गायकवाड , साधना वाघमारे , छबुताई भालेराव , हिराबाई भालेराव , मंगल भालेराव , संगीता बनसोडे ,विमल सपकाळ , बेबीताई भालेराव , संजीवनी भालेराव यांना सन्मानित करण्यात आले.

तक्षशिला बुध्दविहारात , शिल्पकार नगर येथे झालेल्या या कार्यक्रमात महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम , भव्यदिव्य मिरवणूक , रांगोळी स्पर्धा , डान्स स्पर्धा , संगीत खुर्ची स्पर्धा असा विविध कार्यक्रम राबविण्यात आला.

माता रमाई भिमराव आंबेडकर व भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.
पुरस्काराचे वितरण सौ.साधना दिपक भालेराव , सुरेखा कैलास भालेराव , सुरेखा डी.भालेराव , शोभा आविनाश भालेराव यांचेतर्फे करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!