ताज्या घडामोडी

श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा सोहळा आयोजित केला आहे.

गुरुवार दि. १६/०२/२०२३ रोजी तळेगावातील सर्व सन्माननीय स्वामी भक्तांच्या हस्ते सकाळी ९.३० वा. जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे येथे पालखी सोहळ्याचे स्वागत होईल.

श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा सोहळा आयोजित केला आहे.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, १३ फेब्रुवारी.

गुरुवार दि. १६/०२/२०२३ रोजी तळेगावातील सर्व सन्माननीय स्वामी भक्तांच्या हस्ते सकाळी ९.३० वा. जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे येथे पालखी सोहळ्याचे स्वागत होईल.

सकाळी १०.३० वा. विठ्ठल मंदिर येथे रुद्राभिषेक करण्यात येईल. दु.१२.०० ते ३.०० वाजेपर्यंत विठ्ठल मंदिर, शाळा चौक येथे महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तेव्हा सर्व स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. सायं. ४.०० वा. या मार्गाने ग्रामप्रदक्षिणा – विठ्ठल मंदिर-गणपती चौक चावडी चौक-डोळसनाथ मंदिर भेगडे आळी-गणपती चौक- राजेंद्र चौक बाजार पेठ-तेली आळी मारुती मंदिर चौक- जिजामाता चौक-विठ्ठल मंदिर येथे पालखीची आरती व मुक्काम.

 

शुक्रवार दि. १७/०२/२०२३ रोजी सकाळी ६.३० ते ८.३० रुद्राभिषेक आणि प्रस्थान- सकाळी ९ वा.

।। स्वामीनाम ज्याचे भुखी तो राहिल सर्वदा सुखी ॥ करा क्षमा अपराध महाराज तुम्ही निदी । ।। देहाची होईल पालखी सामर्थ्य हे नामाचे ।। बोलिली लेकरे येही वाकडी उत्तरे ।।॥ नाही विचारिता अधिकार म्यां आपुला ।। ॥ तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा ।।

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे दर्शन मावळवासियांना व तळेगांवकरांना घडावे, जेणेकरुन अनेक कारणाने अक्कलकोट क्षेत्री जाता येत नाही. श्री स्वामींच्या संतत्वाची ख्याती अखंड भारतभर सव्वाशे वर्षापासून दुमदुमत आहे. भक्तांना त्याच्या भक्तीची लौकीक व अलौकीक अनुभुती येऊन त्यांचे जीवन संपन्न, प्रसन्न बनवित आहे. श्री स्वामींची पालखी पादुका आपल्या तळेगाव शहरात येत आहे. तरी दर्शनाची व स्वामी चरणी आपली तन-मन-धनाने निष्ठा अर्पण करण्याची ही अपूर्व संधी प्राप्त होत आहे. तरी सर्व स्वामी भक्तांना विनम्रा निमंत्रण, दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे व शोभा यात्रेस सहभागी होण्याचे श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष.महेश भोपळे – पालखी सोहळा यांनी दिली.

श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे संस्थापक बापुसाहेब जयवंतराव भेगडे हे वर्षानुवर्षे स्वामींची सेवा करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!