ताज्या घडामोडी

समाजप्रेमी कै.दत्तात्रय (आप्पासाहेब) खांडगे यांच्या जयंती निमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये दि. 15/ 02 /2023 रोजी समाजप्रेमी कै. दत्तात्रय (आप्पासाहेब) खांडगे यांच्या 83 जयंतीनिमित्त समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

समाजप्रेमी कै.दत्तात्रय (आप्पासाहेब) खांडगे यांच्या जयंती निमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी १८ फेब्रुवारी.

श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये दि. 15/ 02 /2023 रोजी समाजप्रेमी कै. दत्तात्रय (आप्पासाहेब) खांडगे यांच्या 83 जयंतीनिमित्त समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कै.दत्तात्रय(आप्पासाहेब) खांडगे यांच्या प्रतिमेस श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मा.कु. अजिंक्य खांडगे सर हार घालून दीपप्रज्वलन केले.सचिव मिलिंद शेलार सर,शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख मॅडम, पर्यवेक्षिका . रेणू शर्मा मॅडम, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख .तेजस्विनी सरोदे ,प्राथमिक विभाग प्रमुख सौ.धनश्री पाटील , सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार घालून पुष्प अर्पण केले.

 

पायोनियर हॉस्पिटलचे डॉ. योगेश शहा यांचा स्वागतपरअजिंक्य खांडगे  यांनी केला, डॉ. मृणाली नेवसे ,डॉ. संजय लवटे व त्यांचे सहकारी यांचा स्वागतपर सत्कार शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख यांनी केला. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सामाजिक आरोग्याप्रती सजग राहावे. सुदृढ पिढीच प्रगतशील देशाचे स्पंदन असते.विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचे रक्षण व संवर्धन म्हणजे एक प्रकारे राष्ट्रीय संपत्तीचे व राष्ट्रीय त्याचे संवर्धन आहे असे विचार डॉ.योगेश शहा यांनी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता व आरोग्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.

थोर समाजसेवक कै.आप्पासाहेब खांडगे हे श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांचे वडील होते. तळेगाव दाभाडे येथील तळागाळातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्यात यावे याकरिता स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल शाळेची मुहूर्तमेढ रोवली..

शिक्षणाबद्दल अतिशय कळवळा असणारे, जनजागृतीचे कार्य करणारे ,ज्येष्ठ समाजसेवक आप्पासाहेब या नावाने ते सर्व परिचित होते. सामाजिक परिवर्तनासाठी त्यांचे योगदान फार मोठे होते./@आप्पासाहेबांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना शालेय शिक्षिका सौ. प्रतिभा शिरसाट यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन सौ.जयश्री गायकवाड यांनी केले. या शिबिरात विद्यालयातील एक 1026 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!