ताज्या घडामोडी

मावळ तालुक्याच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न.

संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे कार्य प्रेरणादायी आहे तळागाळातील सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन अनेक प्रश्न सोडवण्याची क्षमता .आप्पा बारणे

मावळ तालुक्याच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १८ फेब्रुवारी.

संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे कार्य प्रेरणादायी आहे तळागाळातील सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन अनेक प्रश्न सोडवण्याची क्षमता .आप्पा बारणे यांच्यामध्ये असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आप्पांच्या मागे ठामपणे उभा राहिला आहे असे मत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
मावळ तालुका बाळासाहेबांची शिवसेना व जनसेवा विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने संसद रत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्राचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते श्रीरंग बारणे यांचा वाढदिवसानिमित्त यथोचित सत्कार करण्यात आला.अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून यावेळी मावळ रत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
नितीन फाकटकर, प्रदीप नाईक, अनिल धर्माधिकारी, दिलीप डोळस, डॉ. अनिल उनकूले, दिव्यांग विकास संस्था तळेगाव दाभाडे आदींना मावळ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

याप्रसंगी काँग्रेस कमिटीचे दिलीपराव ढमाले, जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे बाळासाहेब नेवाळे, कामगार नेते इरफान भाई सय्यद, तळेगाव शहर राष्ट्रवादी अध्यक्ष गणेश काकडे आदींची याप्रसंगी भाषणे झाली.

मावळ तालुक्याच्या वतीने तळेगाव शहरांमध्ये प्रथमच माझा वाढदिवस साजरा होत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे खासदार बारणे यांनी या वेळी नमूद केले .पुढील काळात जोमाने तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानूनच काम करीत राहीन असे वचन याप्रसंगी खासदार बारणे यांनी दिले.

यावेळी तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, देहू अध्यक्ष सुनील हगवणे, तळेगाव शहराध्यक्ष दत्ता भेगडे, तालुका संघटक सुनील मोरे, शेखर भोसले, प्रवक्ते मिलिंद अच्युत, कल्पेश भगत ,नगरसेवक समीर खांडगे, सुनील कारंडे, रोहित लांघे, आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!