ताज्या घडामोडी

स.प.महाविद्यालय पुणे (SP College Pune) येथे ढोल ताशांच्या गजरात, शिवपालखी सोहळा उत्सवात साजरी !!

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ! उत्सव शिवपालखीचा ,जल्लोष शिवजन्माचा !! स.प.महाविद्यालय शिवपालखी सोहळा वर्ष ९ वे २०२३.

स.प.महाविद्यालय पुणे (SP College Pune) येथे ढोल ताशांच्या गजरात, शिवपालखी सोहळा उत्सवात साजरी!!

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, १९ फेब्रुवारी.

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.

     महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर परशूरामभाऊ महाविद्यालयात आज दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवपालखी सोहळा अधिकृत पध्दतीने पार पडला.

 सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी सर परशूरामभाऊ कॉलेज च्या बॉईज हॉस्टेल पासून सुरु झाली. सर्व शिवप्रेमी विद्यार्थ्यांनी उत्साहात वाजत गाजत महाराजांची मिरवणूक काढली होती. महाराजांच्या पालखीवर फुलांचा वर्षाव करीत ढोल पथकाच्या गजरात पालखी काढण्यात आली होती. त्यावेळी संस्थेचे सर्व मान्यवर उपस्थित होते.

स.प.महाविद्यालय शिवपालखी सोहळ्याचे ९ वे वर्ष उत्साहात साजरे करण्यात आले.  सर्वांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. महाविद्यालयाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून हा सोहळा उत्साहात , मंगलमय वातावरणात तसेच, विद्यार्थ्यांनी ढोलताशावर ठेका धरत, महाराजांचा जयघोष करत, फुगड्या खेळत आनंद व्यक्त केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!