ताज्या घडामोडी
Trending

लायन्स हेल्थ क्लबला- डॉक्टर सुहास कानिटकरांच्या आर्थिक सहाय्यातून उपलब्ध केलेल्या जिम इक्विपमेंटचा उद्घघाटन समारंभ उत्साहात संपन्न!

अध्यक्ष मयूर राजगुरव यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले.

लायन्स हेल्थ क्लबला- डॉक्टर सुहास कानिटकरांच्या आर्थिक सहाय्यातून उपलब्ध केलेल्या जिम इक्विपमेंटचा उद्घघाटन समारंभ उत्साहात संपन्न!

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर,२३ फेब्रुवारी.

अध्यक्ष मयूर राजगुरव यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले. अष्टावधानी चेअरमन- लायन  मनोहर दाभाडेंनी हेल्थ क्लबचा संपूर्ण अहवाल आपल्या मनोगतात व्यक्त केला! त्यानंतर , लायन डॉक्टर शालिग्राम भंडारींनी- बॉडीशोत- मजुरी करून रोजीरोटी कमावणाऱ्या अमित कुमारने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दलचं- मनापासून कौतुक केलं! याच बरोबर रोज सकाळी पेपर वाटून शिकणाऱ्या संदाब शेखचंही डॉक्टरांनी मनःपूर्वक अभिनंदन केलं, दोघही गरीब विद्यार्थ्यांना हेल्थ क्लबतर्फे निशुल्क ट्रेनिंग दिलं जातं याचीही माहिती देण्यात आली.

सन 2009 या यावर्षीचा तालुक्यातील-” लायनश्री चा”- सन्मान कल्पेश पाटीलने प्राप्त केला तर यावर्षीचा मॉन्टी उर्फ प्रतीक खांडभोरने हा सन्मान पटकावला! प्रशिक्षक दत्ता पतनपुरे आणि निहाल परदेशी यांच्या तज्ञ मार्गदर्शनामुळेच हे यश आमच्या स्पर्धकांना प्राप्त होत म्हणून या समारंभात त्यांच विशेष कौतुक करण्यात आलं! आयुष्यातील कुठल्याही क्षेत्रात जर आपल्याला पत- पद आणि प्रतिष्ठा प्राप्तीसाठी आपण- निष्क्रियता- अनावश्यक निद्रा आणि परनिंदा या गोष्टी कटाक्षाने टाळण्यानेच वरील गोष्टी आपण प्राप्त करू शकतो.

 

हे सुभाषितातून पुढे आपल्या मनोगतात डॉक्टरांनी स्पष्ट केले! अनुदान प्रदान करणाऱ्या डॉक्टर कानिटरांच लायन संदीप काकडेेंनी विशेष आभार मानले याबरोबरच- लायन सदस्य आणि हेल्थ क्लबचे तरुण लाभार्थी यांचेही आभार व्यक्त केले.

या हेल्थ क्लब बरोबरच- बॅडमिंटन- टेबल टेनिस- योगा क्लास- लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी खुलेनाट्यगृह- पार्क दादा दादी पार्क, तसेच मुकेश बालोद्यान- लायन डॉक्टर दीपकभाई शहा आत्याधुनिक सभागृह, कराटे- डान्स क्लासाबरोबरच मागील ग्राउंडवर- उपलब्ध असलेल्या हुतुतू- खोखो- बास्केटबॉल आणि क्रिकेट अशा विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी ग्राउंड उपलब्ध आहे याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!